Godavari Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Godavari : निशिकांतची आजही मला आठवण येते; व्हिडिओ शेअर करत जितेंद्र जोशी झाला भावुक

जितेंद्र जोशीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने दिवंगत दिग्दर्शक निशिकांत कामत यांना श्रद्धांजली अर्पण करत त्याच्या आगामी चित्रपटाचा प्रोमो सदर केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत अनेक वेगवेगळे प्रयोग होत आहेत. अनेक कलाकार आव्हानात्मक भूमिका साकारून वेगवेगळे विषय हाताळत आहेत. असाच एक विषय म्हणजे 'गोदावरी'. अभिनेता जितेंद्र जोशीने(Jitendra Joshi) नुकतीच सोशल मीडियावर 'गोदावरी'(Godavari) या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. जितेंद्र जोशीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने दिवंगत दिग्दर्शक निशिकांत कामत यांना श्रद्धांजली अर्पण करत त्याच्या आगामी चित्रपटाचा प्रोमो सदर केला आहे. यावेळी जितेंद्र भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

जितेंद्र जोशीने त्याच्या इन्स्टाग्राम हॅंडलवरून पोस्ट केलेला व्हिडीओ गोदावरी नदीच्या काठावर चित्रित करण्यात आला असून, या व्हिडिओच्या माध्यमातून दिवंगत दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विशेष श्रद्धांजली वाहिली आहे. जितेंद्र जोशीनं आपल्या भावना व्यक्त करत म्हटलं की, 'जेव्हा निशिकांत आम्हाला सोडून गेला तेव्हा खूप एकटं पडल्यासारखं वाटत होतं. मी त्याला प्रत्येक कथेत शोधत होतो. त्याच्या नसण्यावर प्रश्नचिन्ह उभे करत होतो, त्याचं असणं माझ्या अवतीभोवती हवं होतं. आणि तेच शोधत असताना मी गोदावरीशी बोलू लागलो आणि तिथेच मला निशिकांत सापडला. आजही मला त्याची आठवण येत आहे'.

जितेंद्र जोशीने 'चित्रपटांवर नितांत प्रेम करणारा दिग्दर्शक आणि आमचा मित्र, निशिकांत कामत यांच्या द्वितीय स्मृतिदिनी, आज आम्ही आमच्या लाडक्या 'गोदावरी' च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करत आहोत..! जगण्यावर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येकाची गोष्ट 'गोदावरी..' ११ नोव्हेंबर २०२२ पासून सर्व चित्रपटगृहांत', असे या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

'गोदावरी' हा चित्रपट ११ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन निखील महाजनने केले असून या चित्रपटात अभिनेता जितेंद्र जोशीसह सखी गोखले, संजय मोने मुख्य भूमिका साकारणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Rule: दिवाळीआधी गुड न्यूज! PF चे पैसे १०० टक्के काढता येणार, कागदपत्रांचीही गरज नाही, वाचा नवे नियम

Patra Chawl Crisis : पत्राचाळ पुनर्विकासात पुन्हा धोक्याची घंटा! ११व्या मजल्यावरून प्लास्टर कोसळले, रहिवाशांचा कंत्राटदारावर संताप

Maharashtra Live News Update: सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार

Pune : पुणेकरांची दिवाळी यंदा धूमधडाक्यात, फटाक्यांची दुकानं २४ तास खुली राहणार

शिक्षक की सावकार? गुरुजी आयटीच्या रडारवर, हजारो शिक्षकांची 'ITR'मधील चलाखी

SCROLL FOR NEXT