Marathi Pori Song Canada Indian Girl Dancing Video Instagram
मनोरंजन बातम्या

Marathi Pori Viral Video: कॅनडातही मराठी गाण्यांची क्रेझ; हिरव्या साडीत 'मराठी पोरी' गाण्यावर तरुणीचा कडक डान्स, VIDEO व्हायरल

Marathi Pori Dance Viral Video: कॅनडामध्ये - 2°C वातावरणात साडी नेसून ‘मराठी पोरी’ या गाण्यावर रील शूट केला आहे.

Chetan Bodke

Marathi Pori Song Canada Indian Girl Dancing Video

येत्या २४ नोव्हेंबरला हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. सध्या सोशल मीडियावर चित्रपटातल्या गाण्यांची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर ‘मराठी पोरी’ हे गाणं रिलीज झालं होतं.गाणं रिलीज होताच अवघ्या काही क्षणातच गाण्याची सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली. या गाण्याची फक्त महाराष्ट्रातच नाही तर परदेशातही क्रेझ पाहायला मिळत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या कॅनडामध्ये शूट केलेल्या एका महिलेच्या डान्सने सर्वांचेच लक्ष वेधले. त्या महिलेने कॅनडामध्ये - 2°C वातावरणात साडी नेसून रील शूट केला आहे. सोशल मीडियावर बरेच सेलिब्रिटीही ‘मराठी पोरी’ या गाण्यावर रिल बनवत शेअर करताना दिसत आहे. सर्वच सेलिब्रिटींसह अनुष्का धुमाळ या फॅनने देखील शेअर केलेल्या रिलने सर्वांचेच लक्ष वेधले. तिने रिल करताना, मराठमोळा लूक केला आहे. हिरव्या रंगाची साडी, सोनेरी रंगाचा ब्लाऊज आणि नकात नथ घालून तिने ही रिल शूट केली आहे.

‘मराठी पोरी In Canada कॅनडाच्या -2°C मधेही, ‘मराठी पोरी’ नाचते आज. ‘झिम्मा २’च्या टीमला खूप खूप शुभेच्छा. क्षिती जोग, हेमंत ढोमे सह संपूर्ण चित्रपटाच्या टीमला कॅनडाहून खूप खूप प्रेम...’ अशा आशयाचे कॅप्शन देत तिने ‘मराठी पोरी’चा रिल शेअर केला आहे. अगदी गाण्यामध्ये ज्या प्रमाणे हूक स्टेप्स केल्या आहेत. तशाच हूकस्टेप्स त्या मुलीने सुद्धा केल्या आहेत. या शेअर केलेल्या व्हिडीओला २५ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर लाईक्सचा वर्षाव चाहत्यांनी केला आहे. (Social Media)

क्षितिज पटवर्धन यांचे बोल लाभलेल्या ‘मराठी पोरी’या गाण्याला अमितराज यांनी संगीत दिलेय. तर या डान्स मूड असेलल्या गाण्याला आदर्श शिंदे, वैशाली सामंत आणि मुग्धा कऱ्हाडे यांचा आवाज लाभला आहे. ‘इंदू’च्या ७५व्या वाढदिवसाचे निमित्त साधत सर्वच महिला अनोख्या स्वॅगमध्ये दिसत आहे. ‘मराठी पोरी’ गाण्यातील सर्वच महिलांच्या लूकने प्रेक्षकांचे लक्ष वेधले. कधीही न पाहिलेल्या लूकमध्ये सर्व पात्र दिसत असल्यामुळे गाण्याची प्रचंड चर्चा होतेय.

कलर येल्लो प्रॉडक्शन्सच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मित, हेमंत ढोमे दिग्दर्शित चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर ही दमदार स्टारकास्ट आहे. ‘झिम्मा २’ हा चित्रपट येत्या २४ नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : जिगरी यार गद्दार निघाला! रात्री बायकोसोबत बेडवर; रागात नवऱ्याने मित्राचा गळाच चिरला

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT