Malaika Arora Look: कपाळी चंद्रकोर अन् मराठमोळा श्रृंगार, मलायका अरोराचा ‘ठसकेबाज लूक’ पाहिलात का?

Malaika Arora News: अभिनेत्री मलायका अरोराने नुकताच ‘झी मराठी पुरस्कार’ साठी सोहळ्यासाठी मराठमोळा अंदाज केला आहे.
Malaika Arora Maharashtrian Look
Malaika Arora Maharashtrian LookSaam Tv
Published On

Malaika Arora Maharashtrian Look

कायमच आपल्या फॅशनमुळे मलायका अरोरा चर्चेत राहते. गेल्या काही दिवसांपूर्वी मलायकाने आपला ४८ वा वाढदिवस दणक्यात साजरा केला. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री मलायका अरोराचा मराठमोळा अंदाज प्रचंड चर्चेत आला आहे. हा लूक तिने ‘झी मराठी पुरस्कार’ साठी केलेला आहे.

Malaika Arora Maharashtrian Look
Famous Marathi Serial Off Air: ९ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम घेणार प्रेक्षकांचा निरोप

मलायकाने हा मराठमोळ्या अंदाजातला लूक नुकताच चाहत्यांसोबत शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये मलायकाने कोळीन पद्धतीची साडी नेसली असून केसामध्ये गजरा, नकात नथ, कपाळाला चंद्रकोर पायामध्ये पैंजण, हातात बांगड्या घातलेला मलायकाचा मराठमोळा लूक चांगलाच व्हायरल होत आहे. मलायकाने या व्हिडीओला ‘पारंपारिक ते अधिक सुंदर’ अशा आशयाचा कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर केला आहे. अभिनेत्रीच्या या मराठमोळ्या अंदाजावर चाहत्यांनी मराठीतच कमेंट करण्याचा प्रयत्न केला आहे.

मलायकाचा ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्यामधला हा लूक प्रचंड चर्चेत आला असून तिच्या लूकचे सर्वत्र कौतुक होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ‘झी मराठी’च्या सोशल मीडिया पेजवर ‘झी मराठी पुरस्कार’चा प्रोमो शेअर करण्यात आला होता. यावेळी तिचा मराठमोळा लूक चर्चेचा विषय ठरला होता.

एवढंच नाही तर, मलायका आणि श्रेया बुगडे या दोघीही मंचावर बेसनाचे लाडू करताना दिसत आहे. सोबतच, तिने यावेळी मराठीमध्येही संवाद साधला. मलायका अरोराच्या कामाबद्दल सांगायचे तर, लवकरच ‘हाऊसफुल ५’ मध्ये ही ती दिसण्याची शक्यता आहे.

Malaika Arora Maharashtrian Look
Aashka Goradia Baby: आशका गोराडियाच्या घरी चिमुकल्याचं आगमन; बाळाची झलक शेअर करत दिली गोड बातमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com