Shivani Surve And Ajinkya Nanaware See Engagement Photos Instagram
मनोरंजन बातम्या

Shivani Surve Engagement Photos: ‘अखेर बंधनात अडकलो...’; शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरेने आटोपला गुपचूप साखरपुडा

Shivani Surve And Ajinkya Nanaware Get Engaged: ‘वाळवी’ आणि ‘झिम्मा २’ मधून प्रचंड प्रकाशझोतात आलेल्या शिवानी सुर्वेने बॉयफ्रेंड अजिंक्य ननावरेसोबत ३१ जानेवारीला गुपचूप साखरपुडा आटोपला.

Chetan Bodke

Shivani Surve And Ajinkya Nanaware See Engagement Photos

२०२४ या वर्षात बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणे अनेक मराठी सेलिब्रिटीही लग्नगाठ बांधणार आहेत. ‘वाळवी’ आणि‘झिम्मा २’ मधून प्रचंड प्रकाशझोतात आलेली शिवानी सुर्वेने काल (३१ जानेवारी बुधवारी) गुपचूप साखरपुडा आटोपला. शिवानीने ‘सातव्या मुलीची सातवी गोष्ट’ फेम अभिनेता अजिंक्य ननावरे सोबत साखरपुडा केला आहे. दोघांनीही कधीच सोशल मीडियावर आपल्या रिलेशनबद्दल स्वतः जाहीरपणे सांगितलं नाही.

शिवानी आणि अजिंक्यने बुधवारी अर्थात ३१ जानेवारीला गुपचूप साखरपुडा आटोपला. दोघांच्याही रिलेशनची सोशल मीडियावर अनेकदा रंगली होती. पण त्यांनी कधीच आपल्या रिलेशनबद्दल स्पष्टपणे कधीच चाहत्यांना सांगितले नाही. हे कपल अनेकदा एकत्र सुट्टीही एन्जॉय करायला जायचे. गेल्या अनेक दिवसांपासून हे कपल एकमेकांना डेट करीत आहेत.

आपलं आवडतं कपल केव्हा लग्न करणार याबद्दल चाहत्यांना उत्सुकता आहे. शिवानीने लग्नाचे फोटो ‘अखेर बंधनात अडकलो’ असं कॅप्शन देत अभिनेत्रीने साखरपुड्याची पोस्ट शेअर केली आहे. साखरपुड्यात शिवानी आणि अजिंक्य हटके लूकमध्ये पाहायला मिळत आहेत.

साखरपुड्यात शिवानीने फिकट जांभळ्या रंगाची फॅन्सी साडी परिधान केलेली दिसत आहे. तर त्यावर तिने हिरव्या बांगड्या घातल्या असून सिंपल मेकअप केलेला दिसत आहे. तर अजिंक्यने पांढऱ्या रंगाचा कुर्ता, सलवार, जॅकेट आणि त्यावर टोपी घातली होती. अभिनेत्याचा हा लूक खूपच सुंदर दिसत होता. अंगठी घालताना दोघांच्याही चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसत येत असून दोघांच्याही साखरपुड्याच्या फोटोची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. शिवानी आणि अजिंक्यचा साखरपुडा खूपच साध्या पद्धतीने पार पडला. सेलिब्रिटी मित्रांकडून, फॅन्सकडून आणि नातेवाईकांकडून या कपलवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अजिंक्यच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत प्रमुख भूमिकेत आहे. सध्या ही मालिका टीआरपी चार्टमधील आघाडीची मालिका असल्याचं दिसत आहे. तर शिवानीच्या कामाविषयी बोलायचं तर, 'वाळवी' आणि झिम्मा २' सारख्या सुपर डुपर हिट चित्रपटांतून तिने प्रेक्षकांचे मन जिंकले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यामध्ये पोलिस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू, फुरसुंगी रेल्वे क्रॉसिंगजवळ ट्रेनने दिली धडक

Maharashtra Live News Update: पत्नीच्या हत्ये प्रकरणातील कैद्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहातील घटना

Political Explainer : ठाकरेंनंतर एकनाथ शिंदेंचाही भीमशक्ती-शिवशक्तीचा प्रयोग; कुणाची ताकद वाढणार?

Pune Tourism : मित्रांची साथ अन् बाईक राइड, वीकेंडला पाहा पुण्यातील 'हा' मनमोहक धबधबा

Maharashtra Politics : सोन्याचा चमचा अन् भरलेलं ताट, विधान परिषदेत एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे यांच्यात जुंपली

SCROLL FOR NEXT