Yogita Chavan And Saorabh Choughule Wedding Saam Tv
मनोरंजन बातम्या

रिल लाइफ ते रिअल लाइफ! 'जीव माझा गुंतला' फेम Yogita Chavan आणि Saorabh Choughule अडकले लग्नबंधनात

Yogita And Saorabh Wedding Photo: योगिता आणि सौरभ यांनी मोठ्या थाटामाटामध्ये आज लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या कपलवर त्यांच्या चाहत्यांनी आणि मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Priya More

Yogita Chavan And Saorabh Choughule Wedding:

कलर्स मराठीवरील प्रसिद्ध मालिका 'जीव माझा गुंतला'ला (Jeev Majha Guntala) प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळाली. या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारलेल्या योगिता चव्हाण (Yogita Chavan) आणि सौरभ चौघुले (Saorabh Choughule) यांनी प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले.

या रिल लाइफ कपलने एकमेकांना रिअल लाइफमध्ये देखील आयुष्याचा जोडीदार म्हणून निवड केली आहे. योगिता आणि सौरभ यांनी मोठ्या थाटामाटामध्ये आज लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या कपलवर त्यांच्या चाहत्यांनी आणि मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुलेने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचा फोटो शेअर केला. या फोटोच्या माध्यमातून त्यांनी विवाहबंधनात अडकल्याची गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली. या दोघांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. योगिता आणि सौरभे लग्नामध्ये खूपच क्युट दिसत होते. योगिताने हिरवी काठ असेलली मरून कलरची साडी नेसली होती. नववधूच्या रुपामध्ये योगिता खूपच सुंदर दिसत होती. तर सौरभने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि धोरत परिधान केले होते. त्याचसोबत त्याने हिरव्या रंगाची शाल आणि डोक्यावर हिरव्या-सोनेरी रंगाचा फेटा बांधला होता. या लूकमध्ये सौरभ खूपच हँडसम दिसत होता.

योगिता आणि सौरभने इन्स्टावर लग्नातील सुंदर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'कायमचा हमसफर, 03.03.2024' कॅप्शनमध्ये त्यांनी लग्नाची तारीख टाकली आहे. या फोटोमध्ये दिसत आहे की, सौरभ योगिताच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालत आहे. दोघेही एकमेकांकडे पाहून गोड स्माईल देत आहेत. योगिता आणि सौरभवर त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करत भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहे.

योगिता आणि सौरभने 'जीव माझा गुंतला' या मालिकेमध्ये एकत्र काम केले. या मालिकेमध्ये योगिताने अंतराची भूमिका साकारली होती. तर सौरभने मल्हारची भूमिका साकारली होती. या जोडीला प्रेक्षकांनी खूप चांगली पसंती दिली. या मालिकेमुळे या कपलला विशेष पसंती मिळाली. आता या रिललाइफ कपलने रिअल लाइफमध्ये एकमेकांसोबत लग्न केल्यामुळे त्यांचे चाहते खूपच आनंदी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT