Jay Bhanushali-Mahhi Vij SAAM TV
मनोरंजन बातम्या

Jay Bhanushali-Mahhi Vij : घटस्फोटाच्या चर्चांवर माही विजने मौन सोडलं, VIDEO शेअर करून सर्व सांगितलं

Mahhi Vij Talk On Divorce : सोशल मीडियावर माही आणि जयच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर माहीने आता सडेतोड उत्तर दिले आहे. ती नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

माही वीज आणि जय भानुशालीच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे.

माही वीजने व्हिडीओ शेअर करून आपल्या घटस्फोटाच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे.

माही वीज आणि जय भानुशाली टिव्हीची प्रसिद्ध जोडी आहे.

टिव्हीची प्रसिद्ध जोडी माही वीज आणि जय भानुशाली यांचा घटस्फोट झाल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगली रंगली आहे. यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कमेंट्स येत आहेत. अशात आता माही वीजयाने यावर मौन सोडले आहे. तिने एक व्हिडीओ शेअर करून यासंबंधित माहिती चाहत्यांना दिली आहे.

माही वीजने शेअर केलेल्या व्हिडीओत तिने घटस्फोटाची गोष्ट अफवा असल्याचे सांगितले आहे. तसेच यावर कायदेशीर कारवाई केल्याचे ही म्हटले आहे. माहीने हा व्हिडीओ तिच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे. माहीने व्हिडीओमध्ये बोलते की, "मला या विषयावर बोलायचेही नव्हते. मला माहित आहे लोक कमेंट आणि लाईक्ससाठी काही करू शकतात. मी कुठेतरी वाचले की मी (माही वीज) घटस्फोटाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली आहे. मला ते कागदपत्रे दाखवा. दुसरे म्हणजे, जोपर्यंत आम्ही काही बोलत नाही तोपर्यंत तुम्हाला आमच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही."

माही पुढे म्हणाली, "मी एक कलाकार असले तरी मला जे शेअर करावेस वाटेल तेवढेच मी शेअर करेन. माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत. मला तीन मुलं आहेत. मला खुशीने असाच एक घटस्फोट संबंधित मेसेज दाखवला आणि विचारले की हा काय मूर्खपणा आहे? कुठे तरी वाचले की मी जयकडून 5 कोटी रुपयांची पोटगी घेतली आहे. जेव्हा तुमच्याकडे पुरावे असतील तेव्हाच तुम्ही बोला..."

माही शेवटी म्हणाली की, "आमच्या प्रायव्हसीचा आदर करा. आम्हाला काही सांगावेसे वाटले तर आम्ही स्वतः सर्वकाही सांगू, मात्र खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. जय माझे कुटुंब आहे. तो एक उत्कृष्ट बाप आणि माणूस आहे... " माही वीजचे हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी यावर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईसह ५ महापालिकेत ठाकरे बंधूंची युती, २ दिवसात घोषणा, उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने सगळं सांगितलं, वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना e-KYC केली तरीही ₹१५०० कायमचे बंद होणार, नेमकं कारण काय? समोर आली अपडेट

Heart Attack: सायलेंट हार्ट अटॅक...अत्यंत धोकादायक आणि न समजून येणारी लक्षणं, काय आहेत जाणून घ्या

Marathi Movie Teaser: 'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?'; निर्मिती सावंत - प्रार्थना बेहेरे उलगडणार सासू-सुनेचं खट्याळ नातं, पाहा VIDEO

Tamarind Pickle Recipe : आंबट गोड चिंचेचे लोणचे, पाहताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल

SCROLL FOR NEXT