Jawan Film Burst Firecrackers in Theater Twitter
मनोरंजन बातम्या

Jawan Film Burst Firecrackers in Theater: शाहरुख खानच्या चाहत्यांनी थिएटरमध्येच फोडले फटाके, मालेगावातील धक्कादायक प्रकार

Malegaon News: मालेगावात ‘जवान’ चित्रपट पाहायला गेलेल्या एका फॅनने थेट थिएटरमध्येच फटाके फोडलेय.

Chetan Bodke

Jawan Malegaon News

ॲटली दिग्दर्शित ‘जवान’ची प्रेक्षकांमध्ये आजही क्रेझ कायम आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन आज एक महिना जरी झाला असला तरी, प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची क्रेझ कायम आहे. आपण अनेकदा आवडत्या सेलिब्रिटीचा चित्रपट म्हटलं की, फॅन्स थिएटरमध्ये स्क्रिन्सच्या समोर येउन नाचताना पाहिलंय. पण सध्या नाशिक जवळच्या मालेगावात ‘जवान’ चित्रपट पाहायला गेलेल्या एका चाहत्याने थिएटरमध्ये फटाके फोडल्याची घटना घडलीय. या घटनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा शाहरुखच्या स्टारडमची चर्चा होतेय.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरामध्ये किंग खानच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगच्या वेळी थिएटरमध्ये फटाके फोडलेय. ही घटना शुक्रवारी मालेगावातील कमलदीप थिएटरमध्ये घडली आहे. यावेळी किंग खानच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये फटाके फोडल्यामुळे उपस्थित प्रेक्षकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. शाहरुख खानच्या फॅन्सचा हा अतिउत्साह पाहून पोलिसांनी कारवाई केली आहे. सार्वजनिक ठिकाणीच नाही तर, थिएटरमध्येही प्रेक्षकांना ज्वलंतशिल गोष्टी नेण्यासाठी बंदी आहे. पण तरीही सुद्धा त्या प्रेक्षकांनी हे फटाके कसे काय नेले?, असा प्रश्न सध्या नेटकरी उपस्थित करीत आहे.

दरम्यान, थिएटरमध्ये चित्रपटातील गाणं सुरु होताच काही फॅन्सने थिएटरमध्ये फटाके लावले. फटाके पाहून अनेकांना पळता भुई थोडी झाली होती. थिएटरमध्ये फटाके फोडल्यानंतर हा शो मधूनच बंद करण्यात आला. हा प्रकार घडल्यानंतर लगेचच थिएटर मालकांनी पोलिसांना पाचारण केले. ज्यांनी थिएटरमध्ये फटाके फोडलेय, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.फटाके फोडणाऱ्यांवर शहरातील रमजान पुरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यवाही सुरू आहे. सध्या सोशल मीडियावर थिएटरमधला हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

ॲटली दिग्दर्शित ‘जवान’मध्ये, शाहरुखसोबत नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पदुकोण, संजय दत्त, गिरिजा ओक, सान्या मल्होत्रा, प्रियामणीसह अनेक अभिनेत्रींनी चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. चित्रपट प्रदर्शित होताच पहिल्याच दिवशी चित्रपटाने तब्बल १० चित्रपटांचा रेकॉर्ड मोडित काढला होता. चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना झाला असून चित्रपटाने भारतामध्ये आतापर्यंत ६१८.८३ कोटींचा टप्पा गाठला आहे. तर जगभरात चित्रपटाने १,१०३ कोटींचा टप्पा गाठला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT