Javed Akhtar and Kangana Ranaut's  Saam TV
मनोरंजन बातम्या

Javed Akhtar-Kangana Ranaut Case: मला अपमानास्पद वाटलं... कंगनाच्या आरोपांवर जावेद अख्तर यांनी अखेर मौन सोडले

Javed Akhtar On Kangana Ranaut's Statement: जावेद अख्तर यांनी कारवाई करत कंगनाविरोधात न्यायालयात अर्ज दाखल केला

Pooja Dange

Javed Akhtar Spole On Kangana Ranaut Interview: कंगना रनौतने काही वर्षांपूर्वी जावेद अख्तर यांच्यावर अनेक धक्कादायक आरोप केले होते. त्या आरोपांनंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली होती. कंगनाने आरोप केला होता की जावेद अख्तर तिला धमक्या देतात.

एवढेच नाही तर सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्रीने जावेद अख्तरवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोपही केला होता. यानंतर अख्तर यांनी कारवाई करत कंगनाविरोधात न्यायालयात अर्ज दाखल केला, त्यावर बुधवारी सुनावणी झाली.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, जावेद अख्तर न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर म्हणाले, 'माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. मी लखनऊचा आहे, तिथे 'तू' ऐवजी 'आप' म्हणण्याची प्रथा आहे. जरी कोणी तुमच्यापेक्षा 30-40 वर्षांनी लहान असेल तरीही. मी कधी माझ्या वकिलाला देखील तू म्हणून हाक मारली नाही. माझ्यावर लावण्यात आलेल्या आरोपांमुळे मी आश्चर्यचकित झालो आहे.'

जावेद अख्तर पुढे म्हणाले, 'फेब्रुवारी 2020 मध्ये कंगनाने एका मुलाखतीदरम्यान माझ्यावर आरोप केले होते. त्यानंतर काही महिन्यांनी सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली. यानंतर कंगनाची एक मुलाखत चर्चेत आली,

मी त्यावर प्रतिक्रिया दिली नसली तरी तिने माझ्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केल्यावर मला अपमानास्पद वाटले. एवढेच नाही तर मी एका आत्महत्येच्या गटाचा भाग आहे आणि अशाच प्रकारे लोकांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करतो, असेही तिने म्हटले आहे. हे अजिबात खरे नाही.'

जावेद अख्तर यांनी असेही सांगितले की, मी आणि माझी पत्नी शबाना आझमी यांना कंगना रनौतचा अभिनय खूप आवडतो. ते म्हणाला की एकदा आम्ही कंगनाला आमच्या घरी आमंत्रित केले होते, परंतु कंगनाने त्याऐवजी त्यांना हाऊस-वॉर्मिंग पार्टीसाठी आमंत्रित केले.

कंगना रनौतची ती मुलाखतही कोर्टात दाखविण्यात आली होती ज्यात कंगनाने जावेद अख्तरवर आरोप केला होता. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ जून रोजी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Biscuits Side Effects: तुम्हालाही बिस्कीट खायला आवडतं? पण होतात 'हे' गंभीर परिणाम, एकदा वाचाच

SCROLL FOR NEXT