Ramsha Farooqui Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ramsha Farooqui: 'जाऊ बाई गावात' शो जिंकल्यानंतर रमशा फारुकीची मोठी घोषणा, बक्षीसाची पूर्ण रक्कम शाळेसाठी करणार दान

Ramsha Farooqui Bigg Announcement: सध्या रमशावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या शोच्या ट्रॉफीसोबत रमशाला २० लाखांची रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली होती. हा शो जिंकल्यानंतर रमशाने मोठी घोषणा केली आहे.

Priya More

Jau Bai Gaavat Winner:

झी मराठीवरील प्रसिद्ध रियालिटी शो 'जाऊ बाई गावात' (Jau Bai Gaavat Show) नुकताच संपला. या शोचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. रमशा फारुकीने (Ramsha Farooqui) या शोची ट्रॉफी जिंकली. रमशा ही या शोच्या पहिल्या सीझनची विनर ठरली. तर अंकिता मेस्त्री ही या शोची पहिली रनर अप ठरली आहे. सध्या रमशावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या शोच्या ट्रॉफीसोबत रमशाला २० लाखांची रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली होती. हा शो जिंकल्यानंतर रमशाने मोठी घोषणा केली आहे.

११ फेब्रुवारीला या शोचा ग्रँड फिनाले सोहळा पार पडला. प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी या शोच्या विनरची घोषणा केली. त्यांनी जेव्हा रमशा फारुकी ही या शोची विनर असल्याची घोषणा केली तेव्हा सर्वजण आश्चर्यचकीत झाले. महत्वाचे म्हणजे रमशाला देखील ती या शोची विनर झाल्यावर विश्वास बसत नव्हता. हा शो जिंकल्यानंतर रमशावर प्रेक्षकांसह ज्या गावामध्ये या शोचे शूटिंग सुरू होते त्या बावधन गावातील गावकऱ्यांनी शुभेच्छासह प्रेमाचा वर्षाव केला. हा शो जिंकल्यानंतर रमशाने सोशल मीडियावर लाइव्ह येत प्रेक्षकांचे आभार मानले आणि मोठी घोषणा केली. तिने या शोची विनर झाल्यानंतर मिळालेली २० लाखांची रक्कम ही दान करणार असल्याचे ठरवल्याचे सांगितले. तिने ही रक्कम बावधन गावातील शाळेसाठी दान केली. रमशाच्या या निर्णयाचे देखील खूपच कौतुक होत आहे.

'जाऊ बाई गावात' या शोला ४ डिसेंबर २०२३ पासून सुरुवात झाली होती. या शोचा प्रवास ११ फेब्रुवारीला संपला. या शोमध्ये शहरामध्ये राहणाऱ्या आणि मोठ्या कुटुंबामध्ये लाडवलेल्या मुली सहभागी झाल्या होत्या. त्यांना या शोमध्ये गावामध्ये राहून गावातील कामं करावी लागली. हा टास्क या मुलींसाठी खूपच मोठा होता. पण तरी देखील त्यांनी टफ फाइट देत या गावामध्ये राहून दाखवलं. सातारा जिल्ह्यातला बावधन गावामध्ये या मुली राहिल्या आणि त्यांनी गावकऱ्यांचे मन जिंकले. या शोमध्ये संस्कृती, रमशा, अंकिता, श्रेजा आणि रसिका या पाच जणींनी ग्रँड फिनालेपर्यंत झेप घेतली. पण अखेर या शोची ट्रॉफी आपल्या नावावर करण्यात रमशालाच यश मिळाले.

रमशा फारुकी ही या स्पर्धेतील अशी स्पर्धक होती जिने इतर सर्व स्पर्धक मुलीना मागे टाकले. तिने आपल्या चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर हा शो जिंकला. शहरामध्ये राहत असून सुद्धा तिने सर्व गावकऱ्यांना आपलंसं करून त्यांच्या मनामध्ये स्थान निर्माण केले. तिने गावामध्ये राहून प्रत्येक टास्क पूर्ण केला. त्यामुळे रमशाला चांगली पसंती मिळाली आणि तिचा चाहतावर्ग देखील वाढला. अशामध्ये या सर्वांच्या प्रेमापोटीच तिला हा शो जिंकण्यात यश मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

लठ्ठपणामुळे मधुमेह होतो का? या दोघांमधील संबंध समजून घ्या...

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

Pitbull And Ieopard Fight: पिटबूल आणि बिबट्यामध्ये थरारक झुंज; दोघे एकमेकांवर पडले भारी, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहिलात का?

SCROLL FOR NEXT