Jarann SAAM TV
मनोरंजन बातम्या

Jarann : 'जारण'चा थरार घरबसल्या अनुभवा; अमृता सुभाषचा चित्रपट ओटीटीवर, कधी अन् कुठे? वाचा अपडेट

Jarann OTT Released : अमृता सुभाष आणि अनिता दातेचा 'जारण' मराठी चित्रपट आता लवकरच ओटीटीवर पाहता येणार आहे. चित्रपटाचे ओटीटी अपडेट जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'जारण' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.

अमृता सुभाष आणि अनिता दातेचा 'जारण' चित्रपट घरबसल्या ओटीटीवर पाहता येणार आहे.

'जारण' 6 जूनला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे.

'जारण' (Jarann) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून आता जारणची जादू घरबसल्या पाहायला मिळणार आहे. 'जारण' पाहण्यासाठी थिएटर हाऊसफुल पाहायला मिळाली. 'जारण' 6 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दोन महिन्यांनंतर 'जारण' चित्रपट ओटीटीवर येणार आहे. 'जारण' चित्रपटात अमृता सुभाष (Amruta Subhash ) आणि अनिता दाते (Anita Date) यांनी आपल्या अभिनयाने चारचाँद लावले आहेत.

'जारण' हा हॉरर चित्रपट आहे. 'जारण'मध्ये दमदार अभिनय, हृदयाला भिडणारी कथा आणि उत्तम दिग्दर्शन पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. भय आणि सत्याच्या कचाट्यात अडकलेल्या स्त्रीच्या रुपात अमृता सुभाष पाहायला मिळते. तिच्या व्यक्तिरेखेला भावनिक जोड आहे. ही जादू ओटीटीवर कधी पासून पाहता येणार, जाणून घेऊयात.

'जारण' ओटीटीवर कधी येणार?

'जारण'च्या ओटीटी अपडेटचे नवीन पोस्टर शेअर करण्यात आले आहे. ज्यात अमृता सुभाष-अनिता दातेचे थरारक रुप पाहायला मिळत आहे. या पोस्टरला एक हटके कॅप्शन देण्यात आले आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं की," 'जारण' म्हणजे ब्लॅक मॅजिक हे जारण आता सुरु झालं आहे." 'जारण' चित्रपट 'मराठी झी ५'वर पाहता येणार आहे. 'जारण' ओटीटीवर 8 ऑगस्टला रिलीज होणार आहे.

'जारण' स्टारकास्ट

'जारण' चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली आहे. 'जारण' चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन हृषीकेश गुप्ते यांनी केले आहे. 'जारण' चित्रपटात अमृता सुभाष, अनिता दातेसोबत किशोर कदम, ज्योती माळशे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांचाही दमदार अभिनय पाहायला मिळाला.

'जारण' थिएटरमध्ये कधी रिलीज झाला?

6 जून

'जारण' ओटीटी रिलीज डेट काय?

8 ऑगस्ट

'जारण' कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार?

'मराठी झी ५'

'जारण' मध्ये मुख्य भूमिकेत कोण?

अमृता सुभाष - अनिता दाते

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Herbal Tea : दुधाचा वापर न करता बनवा 'या' ५ प्रकारच्या हर्बल टी

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवड शहराला अजित नगर असं नाव द्या, जालन्यात मराठा महासंघाची मागणी

Ardh Kendra Yog: 165 वर्षांनंतर या राशी छप्परफाड धन कमावणार; अर्धकेंद्र योगाने होणार भरभराट

गर्दीत लोकल पकडताना होत्याचं नव्हतं, धावत्या Local खाली महिला सापडली अन्...

Lunch And Dinner Time: दुपार आणि संध्याकाळच्या जेवणाची योग्य वेळ कोणती?

SCROLL FOR NEXT