Paatal Lok Season 2 Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Paatal Lok Season 2: अभिनेता जयदीप अहलावतने केला मोठा खुलासा, म्हणाला 'आम्हाला टाचा घासाव्या लागतील'

अमेझॉन प्राईम व्हिडिओने 'पाताल लोक' वेबसीरीजच्या दुसऱ्या सीझनला दिला ग्रीन सिग्नल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Upcoming Web Series: 'पाताल लोक' ही वेबसीरीज 2020मध्ये प्रदर्शित झाली होती. प्रदर्शनानंतर काही काळातच ही वेबसीरीज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या वेबसीरीजचा पहिला सीझन पाहिल्यानंतर लोकांनी दुसऱ्या सीझनची मागणी करायला सुरुवात केली होती. तेव्हापासून चाहते या वेबसीरीजच्या दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपणार आहे. या वेबसीरीजमधील मुख्य कलाकार जयदीप अहलावत पुन्हा एकदा त्याची लोकप्रिय व्यक्तिरेखा हाथीराम चौधरीसोबतसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'पाताल लोक' या वेबसीरीजची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. या वेबसीरीजच्या दुसऱ्या सीझनमध्ये काय खास असणार आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अमेझॉन प्राईम व्हिडिओने एप्रिलमध्ये या वेबसीरीजच्या दुसऱ्या सीझनला ग्रीन सिग्नल दिला होता. 'पाताल लोक'चा दुसरा सीझनही लवकरच प्रदर्शित होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

या वेबसीरीजमध्ये जयदीप अहलावत मुख्य भूमिकेत दिसला होता. नीरज काबी, गुल पनाग, स्वस्तिका मुखर्जी, इश्वाक सिंग आणि अभिषेक बॅनर्जी या 'पाताल लोक'मधील कलाकारांनाही चांगलीच पसंती मिळाली होती. या वेबसीरीजची निर्मिती अनुष्का शर्मा आणि तिचा भाऊ कर्णेश शर्मा यांच्या प्रॉडक्शन हाऊसने केली होती. आता या मालिकेचे शुटिंग कधी सुरू होणार हे या वेबसीरीजच्या प्रमुख कलाकार जयदीप अहलावतने सांगितले आहे. (Web Series)

'पाताल लोक' या वेबसीरीजबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत होते. परंतु दुसऱ्या सीझनविषयी निर्मात्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. नुकतेच जयदीप अहलावत यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सांगितले की, 'पुढील महिन्यापासून (नोव्हेंबर) सीझन 2 च्या शूटिंगला सुरूवात केली जाईल. दहा दिवसांनी 'पाताल लोक सीझन 2'चे चित्रीकरण सुरू होणार आहे.' (OTT)

'पाताल लोक'साठी चार-साडेचार महिने आम्हाला खूप मेहनत करावी लागेल किंवा आम्हाला टाचा घासाव्या लागतील. हा गंभीर विषय आहे आणि तितक्याच सुंदरतेने लिहिले आहे. मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन.'

अॅमेझॉन प्राईम व्हिडिओच्या 'पाताल लोक' या वेबसीरीजचा पहिला सीझन लोकांना प्रचंड आवडला होता. तेव्हापासून 'पाताल लोक'च्या दुसऱ्या सीझनबद्दल प्रेक्षक उत्सुक आहेत. त्यामुळे 'पाताल लोक2' विषयीची या बातमीने प्रेक्षकांना नक्कीच आनंद होणार आहे. (Amazon Prime)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana ekyc : पती, वडीलांचे e-KYC बंधनकारक; लाडकींची संख्या आणखी घटणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Accident : अस्थी विसर्जन करून परतताना भरधाव कारची ट्रकला धडक; एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

Pillow Talk: पिलो टॉक म्हणजे काय? नवरा- बायकोसाठी का महत्त्वाचे आहे?

Maharashtra Live News Update: मालाडमध्ये १४ वर्षीय मुलाने घेतले जीवन संपवण्याचे टोकाचे पाऊल

डर्टी बाबाचा डर्टी पिक्चर! चैतन्यानंद सरस्वतीच्या इन्स्टिट्यूटमध्ये सापडलं सेक्स टॉय अन् पॉर्न व्हिडिओच्या पाच सीडी

SCROLL FOR NEXT