Upcoming Web Series: एमएक्स प्लेयरवरील अनेक वेबसीरीज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. एमएक्स प्लेयरने नुकतेच त्यांच्या आगामी वेबसीरीजचा टीझर प्रदर्शित केला आहे. 'धारावी बँक' असे या वेबसीरीज नाव आहे. सुनील शेट्टी आणि विवेक ओबेरॉय यांची या वेबसीरिज मुख्य भूमिका साकारत आहेत. ही वेबसीरीज आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक असलेल्या धारावीवर आधारित आहे.
टीझरची सुरुवात भयानक आहे. धारावीच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनच्या पलीकडे असलेल्या गोष्टींचा शोध घेत या वेबसीरीजमध्ये घेण्यात आला आहे. टीझरमध्ये विवेक ओबेरॉयचा व्हॉइस ओव्हर आहे ज्यामध्ये तो सांगत आहे की, धारावीचे फक्त अंडरवर्ल्डशी कनेक्शन इतकीच ओळख नाहीय, धारावी हा एक “औद्योगिक क्षेत्र” आहे. त्यानंतर शेट्टीच्या थलायवान या पात्र तुमच्यासमोर येते, जो धारावीतील एक प्रमुख आहे. सुनील शेट्टीनंतर विवेक ओबेरॉयचे जेसीपी जयंत गावस्कर हे पात्र दिसते. विवेक ओबेरॉय साकारत असलेला पोलिस अधिकारी आधी गोळी मारतो आणि नंतर त्या व्यक्तीचा गुन्हा ठरवतो, असे दाखविण्यात आले आहे.
विवेक ओबेरॉय आणि सुनील शेट्टीसह धारावी बँकमध्ये सोनाली कुलकर्णी, ल्यूक केनी, फ्रेडी दारूवाला, शांती प्रिया, संतोष जुवेकर, नागेश भोसले, सिद्धार्थ मेनन, हितेश भोजराज, रोहित पाठक, जयवंत वाडकर, चिन्मय, मन्मित आणि मन्मित राव यांच्याही भूमिका आहेत. (Actor)
धारावी बँक या वेबसीरीजच्या माध्यमातून शेट्टीचे डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे. धारावी बँकचे टीझर सुनील शेट्टीने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले आहे. तसेच त्याने या पोस्टला कॅप्शन सुद्धा दिले आहे. त्यामध्ये त्याने लिहिले आहे की, “नवीन गोष्टींचा शोध सुरूच ठेवला पाहिजे. तर मी इथे ओटीटी जगात पदार्पण करत आहे. धन्यवाद प्रेक्षकहो, तुम्ही मला नेहमी दिलेल्या प्रेमाबद्दल. #कृतज्ञता #धारावीबँक #फर्स्टलूक. (Web Series)
ईशा देओलने सुनील शेट्टीला त्याच्या पहिल्या वेब सीरिजसाठी शुभेच्छा दिल्या. तिने कमेंटमध्ये लिहिले आहे की, “खूप छान अण्णा, हे पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. हार्दिक शुभेच्छा.” निर्मात्यांनी अद्याप धारावी बँकच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.