Jackie Shroff arrives directly at Chandkheda in Mawla to comfort the his staff Twitter/@alishaikh3310
मनोरंजन बातम्या

Jackie Shroff In Pune: कर्मचाऱ्याच्या सांत्वनासाठी जॅकी श्रॉफ थेट पोहोचला मावळातल्या चांदखेड्यात

Jackie Shroff Pune Visit News: जॅकीचे हेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नेटकरी जॅकीच्या या दिलदारपणाचं आणि माणुसकीचं तोंड भरुन कौतुक करतायत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: बॉलिवूडचा भिडू जॅकी श्रॉफ मोठ्या पडद्यावर जसा हिरो आहे तसाच तो रिअल लाईफमध्येही नायक आहे. याचं ताजं उदाहरण समोर आलयं. जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) याच्या एका कर्मचाऱ्याच्या वडिलांच निधन (Death) झालं. ही बातमी समजल्यावर जॅकी दा थेट त्या कर्मचाऱ्यांच्या घरी पोहोचले तेही अगदी साध्या कपड्यात आणि अगदी साधेपणानं. (Jackie Shroff arrives directly at Chandkheda in Mawla to comfort the his staff)

हे देखील पहा -

जॅकी श्रॉफचा पुण्यातल्या मावळ (Maval) तालुक्यातील चांदखेड (Chandkhed) गावात फार्महाऊस (Farmhouse) आहे. या फार्महाऊसवर सागर दिलीप गायकवाड (Sagar Dilip Gaikwad) हा स्थानिक तरुण काम करतो. नुकतच त्याचे वडिल दिलीप गायकवाड यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. ही बातमी समजताच जॅकीने थेट सागर गायकवाड याचं घर गाठलं. घरी अतिशय साधेपणानं जाऊन सर्व कुटुंबियांचं सांत्वन (Consolation) केलं. यावेळी जॅकी हा सर्वांसोबत जमिनीवर बसला होता. जॅकीचे हेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नेटकरी जॅकीच्या या दिलदारपणाचं आणि माणुसकीचं तोंड भरुन कौतुक करतायत.

जॅकी श्रॉफनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'सौदागर', 'राम लखन', 'त्रिदेव', 'परिंदा', 'बॉर्डर', 'रंगीला', 'अग्निसाक्षी', 'खलनायक' आणि 'शपथ' या जॅकी श्रॉफच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. जॅकी श्रॉफ त्याच्या स्टाईलनं प्रेक्षकांची मनं जिंकतो, त्याच्या बोलण्यात 'भिडू' हा शब्द नेहमीच असतो. सोशल मीडियावर त्याचे अनेक व्हिडिओज् व्हायरल होत असतात. एवढा मोठा स्टार असूनही जॅकीला त्याचा अहंकार नाही हे त्याचं खास वैशिष्ट्य.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

SCROLL FOR NEXT