Digpal Lanjekar Post Instagram/ @digpalofficial
मनोरंजन बातम्या

Digpal Lanjekar: अभिमानास्पद! आता इस्त्राईल सरकारही रस्त्याला देणार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव

इस्त्राईल मधील रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आलं आहे.

Chetan Bodke

Digpal Lanjekar: मराठा साम्राज्याचे संस्थापक शूर योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती. छत्रपती शिवाजी महाराजांची गणना देशातील सर्वात पुरोगामी आणि विवेकी राज्यकर्त्यांमध्ये केली जाते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. तेव्हापासून आजतागायत त्यांची जयंती परंपरेने महाराष्ट्रात शिवजयंती म्हणून साजरी केली जाते. आज शिवजयंती निमित्त महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी गोष्ट घडली आहे. इस्त्राईल मधील रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिलं गेलंय.

याशिवाय शिवराज अष्टकचे निर्माते- दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनाही खास आमंत्रण देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आलाय. या विषयी दिग्पाल लांजेकरांनी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. पोस्ट लिहित दिग्पाल लांजेकर म्हणतात, "ईस्राईल... छळाकडून बळाकडे गेलेल्या या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपार उत्सुकता आहे. त्याचाच एक भाग म्हणून इस्राईलच्या सांस्कृतिक मंत्रालयाने इस्राईल मधील एका रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव त्यांच्या शासनासमोर ठेवला आहे."

"विविध क्षेत्रांतील कामामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या लोकांशी चर्चा करून इस्राईलचे Consulate हे शिवरायांच्या बाबतीत माहिती गोळा करत आहेत. Consulate ऑफिस मधून आलेल्या निमंत्रणानुसार Consul general Mr. Kobbi Shoshani यांची भेट झाली. त्यावेळी त्यांच्याशी शिवरायांच्या रोमहर्षक प्रशासकीय गुणांची आणि त्यासंदर्भातील प्रसंगांची चर्चा झाली."

"या चर्चेच्या वेळी दिक्पाल लांजेकर यांनी सांगितलेले मुद्दे ऐकल्यानंतर श्री. kobbi यांनी शिवरायांची प्रशंसा केली. त्यांना कृष्णराव अर्जुन केळुसकर यांचा अनुवादित ग्रंथाची इंग्रजी प्रत आणि महाराजांच्या जिरेटोपाचे स्मृतिचिन्ह श्री. दिग्पाल लांजेकर यांनी भेट दिले. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव त्रिखंडात असेच गाजत राहो आणि या शिवयज्ञात सातत्याने आमच्याकडून समिधा अर्पण होत राहोत ही शिवचरणी प्रार्थना.. जय शिवराय"

दिग्पाल लांजेकरच्या संकल्पनेतील 'शिवराज अष्टक' या शिवचरित्रावरील चित्रपट श्रुखंलेला तमाम शिवभक्त आणि रसिकांमध्ये खूपच लोकप्रियता मिळाली. शिवराज अष्टक मधील पुढचा सिनेमा म्हणजेच ‘सुभेदार’ या चित्रपटाची घोषणाही करण्यात आली आहे. जून २०२३ ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इस्त्राईल मध्ये दिग्पाल लांजेकर यांचा झालेला सन्मान त्यांच्या कार्याला मिळालेली पोचपावतीच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

SCROLL FOR NEXT