सध्या इस्रायल आणि इराणमधील युद्धाने (Israel- Iran War) संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. या युद्धामुळे सर्वसामान्यांचे खूप हाल होताना दिसत आहे. अशात आता अभिनेत्री गोलशिफतेह फराहानीने (Golshifteh Farahani) आपले स्पष्टच मत मांडले आहे. इस्रायलच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे इराणच्या तेहरान आणि इतर शहरांमधून लोकांना मोठ्या संख्येने स्थलांतरित व्हावे लागले आहे. हे युद्ध कधी संपेल आणि यामुळे किती नुकसान होणार आहे, हे काहीच सांगता न येण्यासारखे आहे.
गोलशिफतेह फराहानी ही इराणी आणि फ्रेंच चित्रपटातील गाजलेली अभिनेत्री आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करून देशात घडत असलेल्या घटनांवर परखडपणे आपले मत मांडले आहे. तिच्या या पोस्टवर अनेक कमेंट्स येत आहे. तिच्या या पोस्टने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तिने एक भावनिक पोस्ट केली आहे.
"तेहरान हे न्यूयॉर्क आणि लंडनपेक्षा मोठे आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि नेतन्याहू यांनी ट्विटरवरून शहरातील 1.7 कोटी लोकांना रात्रीच्या वेळी घरे रिकामी करण्यास सांगितली. मात्र देशात इंटरनेट बंद असल्याने ही बातमी बहुतेक इराणी लोकांपर्यंत पोहोचू शकली नाही. यामुळे सुमारे 300,000 लोक स्थलांतरित झाली आहेत. बाकीचे इंधन परवडत नसल्यामुळे २० तास वाहतुकीत अडकून राहिले."
गोलशिफतेहने घर जळताना पाहण्यासाठी व्हिडीओ कॉल केल्याचा फोटो शेअर करून त्याखाली नोटमध्ये लिहिलं की, "हा कॉल फक्त कालपर्यंतच शक्य होता. इराणशी असलेले सर्व संपर्क तोडले गेले आहेत. आमच्या कुटुंबातील कोण सुरक्षित आहे की नाही, जिवंत आहे की नाही याची आम्हाला कल्पना नाही."
त्यानंतर ट्राफिकचा फोटो शेअर करून लिहिलं की, " ५ रात्री झोप न आल्यानंतर मी तेहरान सोडले. मला माहित नाही की ही रहदारी किती काळ चालते...इस्रायली बॉम्बस्फोटांपासून तेहरानला वाचवण्यासाठी ट्राफिक..."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.