ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच YouTube वर व्हिडिओ पाहायला आवडतं पण तुम्हाला माहिती आहे का की इंटरनेटशिवाय देखील YouTube वर व्हिडिओ कसे पाहू शकता.
आज आम्ही तुम्हाला एक अशी पद्धत सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही इंटरनेटशिवायही सहज व्हिडिओ पाहू शकाल.
तुमचा फोन वाय-फायशी कनेक्ट केलेला असताना तुम्हाला ही ट्रिक वापरावी लागेल.
सर्वप्रथम तुम्हाला तुमचा स्मार्टफोन वाय-फायशी कनेक्ट करावे लागेल.
फोन वाय-फायशी कनेक्ट केल्यानंतर, तुम्हाला इंटरनेटशिवाय पाहायचा असलेला व्हिडिओ YouTube वर शोधा.
व्हिडिओ शोधल्यानंतर, तुम्हाला शेअरसह दिसणाऱ्या तीन डॉटवर क्लिक करा.
तीन डॉटवर क्लिक केल्यानंतर, डाउनलोड पर्यायावर टॅप करा, डाउनलोड केल्यानंतर तुम्ही तुमचा आवडता व्हिडिओ इंटरनेटशिवाय देखील प्ले करू शकाल.