RCB SAAM TV
मनोरंजन बातम्या

RCB च्या विजयानंतर विराटचे डोळे पाणावले, अनुष्काने किंगला दिली जादू की झप्पी, पाहा क्यूट क्षणाचा खास VIDEO

Virat Anushka Video : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयामुळे सध्या सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशात आता विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

काल (3 जून) दिवस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी (RCB ) खूप महत्त्वाचा होता. काल तब्बल 18 वर्षांनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजेतेपद मिळवले आहे. त्यामुळे टीमचा आनंद सध्या गगनात मावत नाही आहे. सर्वत्र RCB चा जयघोष पाहायला मिळत आहे. RCBच्या विजयानंतर सर्व क्रिकेटपटू खूप भावुक होताना दिसले.

विराट कोहलीला (virat kohli) तर अश्रू अनावर झाले. अशात विराट आणि अनुष्काचा (Anushka Sharma) एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विराटला पाहताच अनुष्का धावत येते आणि त्याला घट्ट मिठी मारते. तेव्हा विराट खूप भावुक होऊन रडतो. त्यानंतर तो अनुष्काच्या कपाळावर किस करतो. दोघांनी एकमेकांना मिठी मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अनुष्का कायमच विराटला साथ देताना दिसते. मॅच दरम्यानचे त्यांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनुष्का आणि विराटचे ट्रॉफीसोबतही अनेक फोटो व्हायरल होत आहे. दोघांच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत आहे. RCBच्या विजयानंतर विराट खूप भावुक होतो. तो मैदानावरच गुडघ्यावर बसून रडू लागतो. त्यांच्या डोळ्यांतील पाणी थांबतच नव्हते.

विराट आणि अनुष्काच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. सध्या सर्वत्र विराट आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चाहत्यांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. अनुष्का शर्मा ही मूळची बंगळुरूची आहे. त्यामुळे तिच्या आनंदात अजून भर पडली आहे. विराटचा मैदानातील आनंद पाहून सर्वच भावुक झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope : दिवाळीची सुरुवात दणक्यात होणार; ५ राशींच्या लोकांवर होणार पैशांचा वर्षाव

Rashmika Mandanna Photos: 'काळी बिंदी काळी कुर्ती घालून ...' रश्मिकांच्या लूकने केलं घायाळ

Highest Collection Movie in India: २०२५ मधील आतापर्यंतचे ७ सर्वात मोठे हिट चित्रपट? कोणत्या फिल्मीने केली जास्त कमाई

राज्याच्या राजकारणाला हादरा! सर्व मंत्र्यांनी एकाचवेळी दिले राजीनामे|VIDEO

Mumbai Rain : मुंबई,ठाण्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; नागरिकांची उडाली तारांबळ, VIDEO

SCROLL FOR NEXT