Singer Anweshha Debut in Marathi Film Industry  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Singer Anweshha Debut : इंटरनॅशनल स्टार अन्वेषाचे मराठीत पदार्पण ; सयाजी शिंदेच्या 'पाहिजे जातीचे'मधून करणार नव्या प्रवासाला सुरुवात

Pahije Jatiche Singer-Composer Anweshha : हिंदी सिनेसृष्टीत आवाजाने प्रसिद्धी मिळवले गायिका अन्वेषा आता मराठीत मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.

Pooja Dange

International Star Debut In Marathi Movie :

हिंदी सिनेसृष्टीत आवाजाने प्रसिद्धी मिळवले गायिका अन्वेषा आता मराठीत मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. अन्वेषाने तिच्या आवाजाने आणि संगीताने जगभरात नावलौकिक निवला आहे. सूरमयी मैफिलींनी जगभरातील प्रेक्षकांना अन्वेषाने मंत्रमुग्ध केले आहे. गेल्या दोन दशकांत अन्वेषाने विविध संगीत बँडसह, एकटीने आणि थीम-आधारित संगीत कार्यक्रमांमध्ये सादरीकरण केले आहे.

अन्वेषा आंतरराष्ट्रीय स्टार असून तिने यूएसए, यूके, फ्रान्स, सिंगापूर, जपान, थायलंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, केनिया, दुबई, ओमान, चीन, कॅनडा, कतार आणि स्वित्झर्लंड इत्यादी देशांमध्ये आपली कला सादर केलेली आहे.

प्रतिभासंपन्न अन्वेषाने केवळ गायिकाच म्हणून नव्हे तर प्रतिभावान संगीतकार म्हणूनही स्वतःची ओळख निर्माण केली आहे. 'पाहिजे जातीचे' या चित्रपटाद्वारे अन्वेषा मराठी चित्रपटसृष्टीत संगीतकार म्हणून पदार्पण करीत आहे. प्रसिद्ध गायक अभय जोधपूरकर आणि हृषिकेश रानडे हे या चित्रपटाची निर्मिती करीत असून या चित्रपटात प्रेक्षकांना मधुर सुरांची मेजवानी मिळणार आहे.

पाहिजे जातीचे या चित्रपटातील अनुभवाविषयी बोलताना अन्वेषाने सांगितले की, या चित्रपटाची गाणी आणि पार्श्वसंगीत तयार करताना मला खूप चांगला वेळ मिळाला. विजय तेंडुलकर यांच्या चर्चित नाटकावर आधारित प्रकल्पावर काम करणे हा माझ्यासाठी बहुमान आहे. या चित्रपटाच्या अल्बममध्ये वेगवेगळ्या मूडमधील चार गाणी आहेत. (Latest Entertainment News)

या गाण्यांमध्ये मी ऑर्केस्ट्रल ट्रॅक, सेमी-क्लासिरल, रॉक आणि मराठी लोकसंगीत अशा घटकांचा समावेश केलेला आहे. जलालुद्दीन रुमी आणि संत कबीर यांचे समाजप्रबोधन करणारे विचार दोन गाण्यांमध्ये आहेत. उमा कुलकर्णी यांनी या गाण्यांना आपल्या मधुर आवाजाने एक वेगळी उंची प्रदान केलेली आहे. प्रेक्षकांना ही चारही गाणी प्रचंड आवडतील यात शंका नाही.

अन्वेषाचे संगीत उद्योगातील योगदान फार मोठे आहे. अन्वेषाला फिल्मफेअर अवॉर्ड्स (पूर्व), मिर्ची म्युझिक अवॉर्ड्स (बांगला आणि दक्षिणेतील तामिळ भाषा), टेली सिने अवॉर्ड, टेली सन्मान अवॉर्ड, बिग म्युझिक अवॉर्ड, वुमन एंटरटेनर्स अवॉर्ड, स्टार परिवार अवॉर्ड, चित्रपट पदार्पण पुरस्कार (मराठी नॉन फिल्म), गुजरात स्टेट अॅवॉर्ड (सर्वोत्कृष्ट गुजराती प्लेबॅक) अॅकेडेमिया अॅवॉर्ड इन लॉस एंजिलिस (स्वतंत्र गाणे) आणि GIFA (गुजरात आयकॉनिक फिल्म अवॉर्ड) उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रदान करण्यात आलेले आहेत.

अन्वेषाने आतापर्यंत ए.आर. रहमान, अजय-अतुल, इस्माईल दरबार, हिमेश रेशमिया, प्रीतम, शंकर-एहसान-लॉय आणि इतर अनेक प्रतिष्ठित संगीतकारांसोबत काम केलेले आहे. अन्वेषाने विविध भाषांमधील 550 हून अधिक चित्रपट आणि नॉन फिल्मी गाण्यांना आवाज दिला आहे.

अविनाश विश्वजित आणि हर्षित अभिराज या मराठीतील दिग्गजांसोबतही अन्वेषाने काम केले असून दक्षिणेतील प्रख्यात संगीतकार विद्या सागर यांच्यासोबत काम करण्याचा बहुमान अन्वेषाला मिळालेला आहे.

अन्य संगीतकारांसाठी आवाज देत असतानाच स्वतःचा गायक आणि संगीतकार म्हणूनही तिचा प्रवास अत्यंत जोमाने सुरू आहे. सुनिधी चौहान, जावेद अली, अभय जोधपूरकर, रुपंकर बागची आणि इतर अनेक नामवंत गायकांनी अन्वेषाच्या सुरांनी नटलेल्या गीतांना आपल्या मधुर संगीताने अजरामर केले आहे.

अन्वेषाला संगीताची लहानपणापासूनच आवड होती. तिने वयाच्या चौथ्या वर्षी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे औपचारिक प्रशिक्षण सुरू केले. ‘व्हॉईस ऑफ इंडिया’ आणि ‘म्युझिक का महामुकाबला’ या रियालिटी शोमुळे तिच्या प्रतिभेची जगाला ओळख झाली. अन्वेषाने तेव्हापासूनच आपल्या मधुर आवाजाने प्रेक्षकांना भुरळ घातलेली आहे.

अन्वेषा नेहमी वेगवेगळे प्रयोग करीत असते. अन्वेशाच्या रचना आणि सादरीकरण जगभरातील संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करीत असतात. आता अन्वेषा ‘पाहिजे जातीचे’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून संगीतकार म्हणून प्रेक्षकांसमोर येत आहे. तिच्या कारकिर्दीतील हा एक नवा अध्याय असून यातही ती यशस्वी होईल यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT