Vir Das Landing  Saam Tv
मनोरंजन बातम्या

International Emmy Awards 2023: वीर दासने रचला इतिहास, बेस्ट कॉमेडीसाठी मिळाला इंटरनॅशनल एमी अ‍ॅवॉर्ड

Priya More

Vir Das Landing:

लोकप्रिय अभिनेता आणि स्टँड अप कॉमेडियन वीर दासने (Vir Das) इतिहास रचला आहे. 51 व्या इंटरनॅशनल एमी अ‍ॅवॉर्ड्समध्ये वीर दासला बेस्ट यूनिक कॉमेडी अ‍ॅवॉर्ड मिळाला आहे. शेफाली शाह आणि जिम सरभ यांनाही एमी अ‍ॅवॉर्ड्समध्ये नॉमिनेशन मिळाले होते. पण या दोघांनाही अ‍ॅवॉर्ड मिळाला नाही. तर वीर दासला त्याचा नेटफ्लिक्स स्पेशल शो 'वीर दास: लँडिंग'साठी (Vir Das: Landing) बेस्ट यूनिक कॉमेडीचा एमी अ‍ॅवॉर्ड मिळाला आहे. सध्या वीर दासवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वीर दासला इंटरनॅशनल एमी अ‍ॅवॉर्ड्समध्ये नामांकन मिळण्याची ही दुसरी वेळ आहे. पण त्याला इंटरनॅशनल एमी अ‍ॅवॉर्ड मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. अखेर त्याने या इंटरनॅशनल एमी अ‍ॅवॉर्डवर आपलं नाव कोरलं आहे. वीर दासच्या शोसोबतच, ब्रिटिश कॉमेडी सीरिज 'डेरी गर्ल्स-सीझन 3'ला (Derry Girls-Season 3) देखील बेस्ट यूनिक कॉमेडी अ‍ॅवॉर्ड मिळाला.

2021 मध्ये देखील वीर दासला त्याच्या 'टू इंडिया' कॉमेडी शोसाठी एमी इंटरनॅशनल अ‍ॅवॉर्ड्ससाठी नामांकन मिळाले होते. परंतु त्यानंतर तो हा अ‍ॅवॉर्ड जिंकू शकला नाही. यावर्षी 'दिल्ली क्राइम 2' (नेटफ्लिक्स) साठी अभिनेत्री शेफाली शाह आणि 'रॉकेट बॉईज 2' (सोनी लिव्ह) साठी अभिनेता जिम सरब यांनाही इंटरनॅशनल एमी अ‍ॅवॉर्ड्समध्ये नॉमिनेशन मिळाले आहे.

इंटरनॅशनल एमी अ‍ॅवॉर्ड हँडलने वीर दासच्या फोटोसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स अकाउंटवर यासंदर्भात पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'आमच्याकडे टाय आहे! द इंटरनेशनल एमी फॉर कॉमेडी गोज टू 'वीरदास लँडिंग प्रोड्यूस्ड बाय WeirdasaComedy/रॉटन साइंस/नेटफ्लिक्स #iemmyWIN. ''

तर दुसरीकडे वीर दासला इंटरनॅशनल एमी अ‍ॅवॉर्ड मिळाल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. हा अ‍ॅवॉर्ड जिंकल्यानंतर वीर दासने सांगितले की, 'हा क्षण खरोखरच अवास्तविक आहे - एक अविश्वसनीय सन्मान जो स्वप्नासारखा वाटतो. 'कॉमेडी कॅटेगरी'मध्ये 'वीर दास: लँडिंग'साठी एमी जिंकणे हा माझ्यासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतीय कॉमेडीसाठी मैलाचा दगड आहे.'

तसंच, 'वीर दास: द लँडिंग'ची जागतिक स्तरावर चर्चा होत असल्याचे पाहून आनंद झाला. नेटफ्लिक्स, आकाश शर्मा आणि रेग टायगरमॅन यांना विशेष बनवल्याबद्दल धन्यवाद. स्थानिक कथा तयार करण्यापासून ते जागतिक ख्याती मिळवण्यापर्यंतचा माझा प्रवास आव्हानात्मक असा आहे आणि त्याच्या विकासामध्ये Netflix ने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

IND vs NZ : भारताची स्थिती 'गंभीर', किवींकडे 'विराट' आघाडी; न्यूझीलंडची ३५६ धावांनी सरशी, रोहितसेना पिछाडीवर!

Viral Video: लोकलच्या गर्दीत अंताक्षरीचा खेळ! टाळ, तबल्यासोबत जोरदार मैफिल रंगली; सुंदर VIDEO एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT