Social Media Influencer-Creator At Cannes Saam TV
मनोरंजन बातम्या

Influencer Debut At Cannes Film Festival: बॉलिवूड सेलिब्रिटींसह कान्सच्या रेड कार्पेटवर झळकणार भारतातील लोकप्रिय सोशल मीडिया स्टार

Cannes Film Festival: कान्स फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवरही इन्स्टाग्रामवर इन्फ्लुएन्सर देखील दिसणार आहेत.

Pooja Dange

Social Media Influencer-Creator At Cannes: जगातील सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेल्या कान्सला फेस्टिवलला आजपासून म्हणजेच १६ मेपासून सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक चित्रपटांचे भव्य स्क्रिनिंग होणार आहे. यावेळी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि मानुषी छिल्लरही कान्स महोत्सवात डेब्यू करणार आहेत. इतकंच नाही तर कान्स फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवरही इन्स्टाग्रामवर इन्फ्लुएन्सर देखील आहेत. चला जाणून घेऊया कान्सच्या रेड कार्पेटवर कोणते इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर दिसणार आहेत.

डॉली सिंग

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि कंटेन्ट क्रिएटर डॉली सिंग तिच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. डॉली सिंगचे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 1.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.

एका मुलाखतीत डॉली सिंग म्हणाली, "कान्स फिल्म फेस्टिव्हल हे भारतीय कलाकारांसाठी आंतरराष्ट्रीय मंचावर त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय प्रतिभा चित्रपटाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर आली आहेच, शिवाय सांस्कृतिक बंधने मोडून काढण्यासही मदत केली आहे. तसेच क्रॉस-सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्यास देखील मदत झाली आहे." (Latest Entertainment News)

डॉली सिंग ही कोलगेट व्हिजिबल व्हाईट O2 चा फेस देखील आहे. डॉली सिंगच्या रील आणि व्हिडिओंवर बरेच लोक कमेंट करतात आणि लोकांना तिचा कंटेन्ट खूप आवडते.

रुही दोसानी

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि कंटेन्ट क्रिएटर रुही दोसानी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर तिचे पदार्पण करणार आहे. रूही कान्स फेस्टिवलमध्ये जेंडरलेस फॅशन प्रेसेंट करते. एका मुलाखतीत कान्सबद्दल सांगताना रुही दोसानी म्हणाली, “एका परदेशी ग्रुपने सुरुवात करून मायदेशी परत आल्यावर कलाकार म्हणून माझा प्रवास कसा असेल याची मला कल्पना नव्हती.

माझी विचार माझ्या कलाकृतीला पुन्हा जागतिक स्तरावर नेण्याचा होता. मला फॅशन आणि माझ्या देशाबद्दलचे माझे प्रेम दाखविण्यास आणि साथ देण्यासाठी या व्यासपीठाची मी नेहमीच ऋणी राहीन." सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रुही दोसानीचे व्हिडिओ खूप वेगळे आणि अनोखे आहेत जे लोकांना खूप आवडतात. रुही दोसानीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 2.3 मिलियन फॉलोअर्स आहेत.

रणवीर अल्लाहबादिया

रणवीर अल्लाहबादिया हा एक प्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकर, बिझनेस मॅन आणि कंटेंट क्रिएटर आहे. रणवीरने 2015 साली इंस्टाग्रामवर बीयरबिसेप्सची सुरुवात केली होती आणि आज त्याचे नाव भारतातील सर्वात लोकप्रिय कंटेन्ट निर्मात्यांमध्ये येते. त्यांच्या कंपनीचे अनेक YouTube चॅनल आहेत आणि हजारो लोक त्यांना फॉलो करतात. रणवीर अल्लाहबादिया देखील कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये पदार्पण करणार आहे.

निहारिका NM

निहारिका NM ने Netflix च्या YouTube शो बेहेंसप्लेनिंगमध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसली होती. तिचे इंस्टाग्रामवर ३.२ मिलियन फॅन फॉलोअर्स आहेत. इतकंच नाही तर स्मृती इराणीही निहारिकाचे व्हिडिओ शेअर करत असतात आणि लोकांना निहारिकाचा कंटेंट खूप आवडतो. YourStory ने दिलेल्या वृत्तानुसार, निहारिका कॅलिफोर्नियाच्या चॅपमन युनिव्हर्सिटीमध्ये केस स्टडी करत आहे आणि तिथे तिचे एमबीए करत आहे. ती देखील जगातील सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवात कान्समध्ये सहभागी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांचा मास्टरस्ट्रोक; बड्या नेत्यासह ६ माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Shocking: दुःख डोंगराएवढं! आजारी मुलानं बापाच्या कुशीत डोळे मिटले, धक्का सहन न झाल्यानं बापाचाही हार्ट अटॅकनं मृत्यू

Bus Fire : नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती! प्रवाशांनी भरलेल्या AC बसला आग लागली; 12 जणांचा मृत्यू

Antibiotics Side Effects: अँटिबायोटिक्स घेताहेत भारतीयांचा जीव? WHO च्या इशाऱ्याने भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Fight Video: डेक्कन चौकात दहशत! नदीपात्रातील चौपाटीवरील हॉटेलमध्ये मारामारी

SCROLL FOR NEXT