'इंद्रायणी' (Indrayani ) मालिकेत अधू आणि इंदूचे धुमधडाक्यात लग्न होणार आहे. एकीकडे इंदू आणि अधू यांच्या नव्या नात्याची सुरुवात होणार आहे. पण, गोपाळ हे पचवू शकेल का? गोपाळ आणि इंदूच्या नात्यात अनेक अनपेक्षित वळणं आली. कधी गैरसमज तर कधी प्रेम तर कधी भांडणाची वादळं, कधी दुरावा. शेवटी गोपाळने इंदूला शेवटचा पर्याय दिला कि लग्न झाल्यावर मुंबईमध्ये स्थायिक होऊया पण इंदूला ते मान्य नव्हते. विठूची वाडी, तिची माणसं आणि तिचे शाळेचं स्वप्नं सोडून तिला जाणे मान्य नव्हते.
दुसरीकडे व्यंकू महाराजांना कळणं अधूचे इंदूवर जीवापाड प्रेम आहे आणि त्यांनी इंदूला अधूशी लग्नसाठी विचारणा करणं आणि हे होताच इंदूची झालेली द्विधा मनःस्थिती अखेर विठू पंढरपूरकरने सोडवली. इंदूने अधूसोबत लग्नासाठी होकार दिला असून ती आता तिच्या निर्णयावर ठाम आहे. आता अखेर तो शुभ दिवस आला आहे. मंडप सजला आहे, तोरण लागली आहेत. मुहूर्त देखील निघाला आहे.
'इंद्रायणी' मालिकेत अधू - इंदू यांचा विवासोहळा पार पडणार आहे. लग्नासाठी इंदूचा खास मराठमोळा लूक केला आहे. नऊवारी साडी, नथ, शेला, हिरवा चुडा या लूकमध्ये इंदू खूप सुंदर दिसत आहे. दोघांचाही अस्सल मराठमोळा अंदाज दिसून येणार आहे. लग्न पारंपरिक पध्दतीने पार पडणार आहे. होम, सप्तपदी, मंगलाष्टक हे विधी पार पडणार आहेत. खऱ्या अर्थाने अधूला इंदूची साता जन्मासाठी साथ मिळाली आहे. मालिकेत अधू इंद्रायणीच्या लग्नामुळे आनंदीबाई अजिबात खूश नाही आहे.
आनंदीबाई म्हणजेच अनिता दाते म्हणाली, "आमच्या मालिकेत आता अधोक्षज आणि इंद्रायणीच्या लग्नाचं शूटिंग सुरूआहे. जे खूपच थाटामाटात आणि पारंपरिक पध्द्तीने पार पडणार आहे. ज्यासाठी उत्तम साड्या, नवीन कपडे, दागिने यांची खरेदी केली आहे. संपूर्ण विठूची वाडी लग्नाला उपस्थित आहे. लग्नासाठी घरी लाडू बनवले आहेत, बरीच जय्यत तयारी केली आहे. "
'इंद्रायणी' मालिकेचा कलर्स मराठीवर रविवार 8 जूनला दीड तासाचा विशेष भाग पाहायला मिळणार आहे. विशेष भाग दुपारी १ वाजता आणि संध्यााकळी ७ वाजता पाहता येणार.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.