Singer Pawandeep Car Accident  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Singer Pawandeep Accident: इंडियन आयडॉल विजेता पवनदीप राजनच्या कारला भीषण अपघात; गंभीर जखमी

Singer Pawandeep Car Accident : इंडियन आयडल सीझन १२ चा विजेता गायक पवनदीप राजनचा सोमवारी पहाटे ३:४० वाजता अमरोहा येथे मोठा कार अपघात झाला असून त्याला गंभीर दुखापत झाली आहे.

Shruti Vilas Kadam

Singer Pawandeep Car Accident : इंडियन आयडॉल सीझन 12 चा विजेता आणि लोकप्रिय गायक पवनदीप राजन याचा अहमदाबादजवळ अमरोहा येथे भीषण अपघात झाला आहे. सोमवारी पहाटे 3:40 वाजता अमरोहा परिसरात त्याच्या कारचा अपघात झाला, या अपघातामध्ये त्याच्या डाव्या पायाला आणि उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पवनदीप गंभीर अवस्थेत दिसत आहे.

अपघात इतका भीषण होता की कारचे अक्षरशः चुराडे झाले आहेत. गाडीच्या अवस्थेवरून अपघाताची तीव्रता स्पष्टपणे दिसून येते. सध्या पवनदीपवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या प्रकृतीची माहिती अद्याप समोर आलेली नाही, मात्र त्याच्या चाहत्यांनी त्याचे चाहते लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहे.

पवनदीप राजन हा उत्तराखंडच्या चंपावत जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांनी इंडियन आयडॉल 12 मध्ये उत्कृष्ट गायन कौशल्य दाखवून विजेतेपद पटकावले होते. त्याला पुरस्कार म्हणून 25 लाख रुपये आणि एक लक्झरी कार मिळाली होती. संगीताच्या क्षेत्रात त्याचे योगदान मोठे असून तो विविध वाद्ये वाजवण्यातही पारंगत आहेत.

या अपघाताच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंता वाढली आहे. सोशल मीडियावर त्याच्या प्रकृतीबद्दल अपडेट्ससाठी नेटकरी वाट पाहत आहेत. पवनदीप याचे कुटुंबीय आणि मॅनेजर कडून अद्याप अधिकृत निवेदन आले नाही, यामुळे त्याच्या प्रकृतीबद्दल कोणता अंदाज लावला जात नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT