Vaishali Thakkar end life saam tv
मनोरंजन बातम्या

सिनेविश्वात खळबळ! प्रेम प्रकरणातून प्रसिद्ध अभिनेत्रीनं केली आत्महत्या, घटनास्थळी सापडली सुसाईड नोट

हिंदी मालिकेतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं आत्महत्या केली आहे, कारण...

नरेश शेंडे

मुंबई : सिनेविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. हिंदी मालिकेतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं आत्महत्या केली आहे. ये रिश्ता क्या कहलाता है,आशिकी, ससुराल सिमर का, सुपर सिस्टर आणि लाल इश्क सारख्या मालिकेत अप्रतिम भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीनं जीवन संपवलं आहे. वैशाली ठक्कर असं आत्महत्या केलेल्या अभिनेत्रीचं नाव आहे. वैशालीने प्रेमप्रकरणामुळं इंदौरमध्ये गळफास लावून आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं, अशी माहिती समोर आली आहे. (Indian actress vaishali thakkar ends life)

याबाबत सविस्तर वृत्त असं की, वैशालीनं आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच तेजाजीनगर पोलीस (Police) ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर वैशालीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवला. धक्कादायक बाब म्हणजे घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे. प्रेमप्रकरणातून तिनं आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणाचा तपास तेजाजी नगर पोलीस करत आहेत.

वैशाली ठक्करने ये रिश्ता क्या कहलाता है आणि बिग बॉसमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. वैशाली ठक्करचे सिनेविश्वात लाखोंच्या संख्येत चाहतावर्ग आहे. परंतु, वैशालीने आज आत्महत्या केल्यानं तिच्या चाहत्यांसह सिनेसृष्टीत कलाकारांना धक्का बसला. सोशल मीडियावर अनेकजण तिला भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत. तिच्या जाण्यानं सिनेविश्वात दु:खाचा डोंगर कोसळला आहे. चाहत्यांसह कलाकार या दुखद घटनेमुळं शोक व्यक्त करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update अमरावतीत 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा

माता न तू वैरिणी! चिमुकलीला अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच आई...; ठाण्यातील खळबळजनक घटना|VIDEO

Maharashtra Police Transfer : महाराष्ट्र पोलिस दलात खांदेपालट; २२ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे बदली?

MNS : मराठी असूनही ते एका मराठी मुलीलाच टार्गेट करत आहेत, मनसे नेत्याच्या मुलाकडून शिवीगाळ; इन्फ्लूएन्सरने सांगितली आपबिती

Blood Pressure: ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी वरदान ठरेल 'ही' एक गोष्ट

SCROLL FOR NEXT