Bigg Boss Marathi 4
Bigg Boss Marathi 4Saam Tv

Bigg Boss Marathi 4: रोहित आणि यशश्रीमुळे चढला महेश मांजरेकरांच्या पारा

'बिग बॉस मराठी ४'च्या दुसऱ्या चावडीवर महेश मांजरेकरांनी स्पर्धकांना दाखवला आरसा.
Published on

मुंबई: 'बिग बॉस मराठी 4' (Bigg Boss Marathi) सुरू झाल्यापासूनच वादाला सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी झालेले नॉमिनेशनमुळे स्पर्धकांमध्ये एकमेकांविषयी वाईट मत तयार झाले. त्याचा परिणाम अजुनही घरात दिसत आहे. रोज नवीन गोष्टींवरून नवे वाद या स्पर्धकांमध्ये होत असतात. पहिल्या चावडीवर महेश मांजरेकरांनी सर्वांची चांगलीच शाळा घेतली होती. तर काही स्पर्धकांचे कौतुक सुद्धा केले होते. पहिल्या चावडीवर महेश मांजरेकरांनी स्पर्धकांना दिलेल्या उपदेशाचा विसर पडण्याच्या आत त्यांना दुसऱ्या चावडीला सामोरे जावे लागत आहे. दुसऱ्या चावडीवर महेश मांजरेकरांनी रोहित शिंदे आणि यशश्री मसुरकर यांना चांगलेच खडेबोल सुनावले.

Bigg Boss Marathi 4
Movie Bollywood Release: दिवाळीच्या पूर्वी कधीच चित्रपट प्रदर्शित करत नाही, वाचा खास कारणे

चावडीचे प्रोमो कलर्स मराठीने त्यांच्या सोशल मीडियावर (Social Media) शेअर केले आहेत. महेश मांजरेकरांनी यशश्री मसुरकर आणि रोहित शिंदे यांना चांगेलच धारेवर धरले आहे. अमृता देशमुख आणि यशश्री मसुरकर यांच्या झालेल्या वादामुळे त्यांना टास्कदरम्यान घरात जात आले नाही. अमृताने यशश्री समजावण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. यशश्रीने अमृता देशमुखला सहमती न दर्शिवल्यामुळे त्यांना कॅप्टन होता आले नाही. याच मुद्द्यावरून महेश मांजरेकरांनी यशश्रीची कान उघडणी केली.

महेश मांजरेकरांनी (Mahesh Manjrekar) रोहित विचारले, 'तू कॅप्टन कोणामुळे झालास?' त्यावर रोहितने सगळ्यामुळे, माझ्या टीममधील मुलींमुळे आणि शेवटी योगेश आणि विकासमुळे झालो असे उत्तर दिले. त्याच्या या उत्तरावर महेश मांजरेकर खूप संतापले. ते रोहितला म्हणाले, 'ज्यांच्यामुळे तू कॅप्टन बनलास त्यांनाच तू विसरलास आणि त्या अक्षयला कुशीत घेऊन बसलास. अरे विकास जवळजवळ मेला तुझ्यासाठी. त्याला एक ग्लास पाणी तरी विचारलंस का? किती 'अनग्रेटफुल' आहेस तू?' महेश मांजरेकर यांच्या बोलण्याला विकासाने सहमती दर्शवत त्यांचे आभार मानले.

'बिग बॉस मराठी 4' चा नवा कॅप्टन रोहित झाला आहे. कॅप्टन झाल्यानंतर लगेच रोहितला चावडीवर त्याच्या अनफेअर गेममुळे चांगलेच ऐकून घावे लागले. रोहित कॅप्टन म्हणून किती चांगला आहे हे येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com