Independence Day 2024 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Independence Day 2024: देशभक्तीच्या रंगात रंगली अमृता खानविलकर, 'माँ तुझे सलाम' गाण्यावर जबरदस्त डान्स; पाहा VIDEO

Amruta Khanvilkar Dance: अभिनेत्री अमृता खानविलकरने 'माँ तुझे सलाम' या गाण्यावर जबरदस्त डान्स करत आपल्या चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Manasvi Choudhary

आज संपूर्ण देशभरात ७८ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्ताने 'हर घर तिरंगा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्यापासून ते राजकीय नेते, कलाकार मंडळी स्वातंत्र्यदिन साजरा करत आहेत. मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकरने 'माँ तुझे सलाम' या गाण्यावर जबरदस्त डान्स करत आपल्या चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमृता खानविलकरचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

स्वांतत्र्यदिनाच्या दिवशी मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर देशभक्तीच्या रंगात रंगलेली दिसत आहे. अमृताने 'गेट वे ऑफ इंडिया' येथे 'माँ तुझे सलाम' या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. अमृतासोबत डान्स गुरू अशिष पाटील देखील थिरकताना दिसत आहे. देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा अशा खास थिमचे कपडे त्यांनी परिधान केले आहेत. हा व्हिडीओ शेअर करत अमृताने सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छाही दिल्या आहेत.

अमृता खानविलकरने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'अभिमान, कृतज्ञता, एकता, चिंतन आणि आनंद देशाप्रती प्रेमाने गुंफलेल्या @worldofstree तुमच्यासमोर सादर करायला अभिमान वाटत आहे.' आगामी काळात अमृता तिच्या अमृतकला स्टुडिओ आणि अर्थ एनजीओ यांच्या माध्यमातून वर्ल्ड ऑफ स्त्री नृत्याचा नजराना घेऊन येत आहे. या नृत्यकलेच्या माध्यमातून स्रीशक्तीचे अनोखे रूप सादर करण्यात येणार आहे. यात श्रृगांर, भक्ती, शक्ती आणि स्त्रीतत्व यांची सांगड असणार आहे. येत्या २४ ऑगस्टला वर्ल्ड ऑफ स्त्रीचा प्रीमियर सादर होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukrwar che Upay: शुक्रवारच्या 'या' उपायांनी भाग्याचे दरवाजे उघडतील; घरात सुख-समृद्धी सोबत पैसाही येईल

Todays Horoscope: 'या' राशींच्या व्यक्तींना आज जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी; जाणून घ्या राशीभविष्य

Farmer Protest: बळीराजाचा एल्गार, कर्जमाफीसाठी 'चक्का जाम'; शेतकऱ्यांच्या मरणयातना कधी थांबवणार?

Harshal Patil: हर्षल पाटीलच्या आत्महत्येला सरकार जबाबदार? पाणीपुरवठा मंत्र्यांनी झटकले हात?

Bhandara News: हवामान विभागाकडून भंडाऱ्याला रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेजला सुट्टी

SCROLL FOR NEXT