Raksha Bandhan 2024 : बहीण-भावावरील हे चित्रपट पाहिलेत का? यादी आताच सेव्ह करून ठेवा

Bollywood Movies On Raksha Bandhan : यंदाचा रक्षाबंधन खास करा. आपल्या भावंडासोबत बहीण-भावाच्या नात्यावर आधारित बॉलीवूडचे सुपरहिट चित्रपटांची मेजवानी लुटा. आताच यादी नोट करा.
Bollywood Movies On Raksha Bandhan
Raksha Bandhan 2024 SAAM TV
Published On

आपल्या आयुष्यात सगळ्यात पहिल्यांदा आपला भाऊ आणि बहीण आपले खरे मित्र असतात. बहिण भावाचे नातं जगावेगळं असतं. एकमेकांसोबत भांडण केल्याशिवाय या नात्याचं वर्तुळ पूर्ण होऊच शकत नाही. पण या भांडणात द्वेष नसतो. असते ते फक्त प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा.

भाऊ-बहीण लहान असो किंवा मोठे एकमेकांना त्यांचा आधार असतो. हे पवित्र नाते अधिका घट्ट करण्यासाठी रक्षाबंधन आणि भाऊबीज हे सण साजरे केले जातात. यंदा रक्षाबंधन १९ ऑगस्ट २०२४ रोजी आहे. याच बहीण-भावाच्या नात्यावर अनेक चित्रपट आहेत.

चला तर मग रक्षाबंधनाला आपल्या भाऊ-बहीण सोबत चित्रपटाचा आनंद लुटा.

सरबजीत

एका बहीण आपल्या भावासाठी शेवटपर्यंत लढू शकते हे सरबजीत चित्रपटामुळे सिद्ध झालं आहे. हा चित्रपट पंजाबच्या एका तरुण मुलावर आधारित आहे . २०१६ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. अभिनेता रणदीप हुड्डा आणि ऐश्वर्या राय यांनी यात काम केले आहे. यात एका बहिणीचा भावासाठीचा संघर्ष दाखवला आहे.

ब्रदर्स

आपण म्हणतो की, भावंडच एकमेकांचे पहिले मित्र असतात आणि हेच नातं दाखवणारा चित्रपट म्हणजे ब्रदर्स. यात दोन भाऊ म्हणजेच मॉन्टी (सिद्धार्थ मल्होत्रा) आणि डेव्हिड (अक्षय कुमार) लहानपणी अगदी जवळ असतात. पण त्यांच्या वडिलांच्या मद्यपानामुळे हे कुटुंब मोडते. दोन भावांवर हा चित्रपट आधारित आहे.

रक्षाबंधन

रक्षाबंधन या चित्रपटात लग्न हा विचार आपण गांभीर्याने करावा असं सांगितलं जातं. रक्षाबंधन या चित्रपटात अक्षय कुमारने जबरदस्त प्रमुख भूमिका साकारली आहे. एक भाऊ आणि त्याच्या चार बहिणींच्या लग्नांची जबाबदारी , धडपड यात दाखवली आहे. चित्रपटात भूमी पेडणेकर, सादिया खतीब, सहजमीन कौर, दीपिका खन्ना आणि स्मृती श्रीकांत त्याच्या बहिणींच्या भूमिकेत आहेत.

हम साथ साथ है

कुटुंब म्हणजे पती, पत्नी आणि मुलांसोबत इतर रक्ताच्या नातेवाईकांचा समूह असतो. ज्यामध्ये विवाह आणि दत्तक घेऊन स्वीकारलेल्या मुलांची कथा तसेच भावांचे अतूट प्रेम दाखवण्यात आले आहे. हम साथ साथ है सिनेमा १९९९ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला. जो आजही आपण किती उत्साहाने पाहतो. भाऊ-बहिणीच्या नात्यातलं खरंप्रेम यात दाखवलं आहे.

Bollywood Movies On Raksha Bandhan
15 August Released Movie Collection : रिलीजच्या आधीच बॉक्स ऑफिसवर 'स्त्री २'चा दबदबा, बाकीच्या चित्रपटांची परिस्थिती काय ?

बंधन

भावंडांमध्ये भांडण होतचं असतात. पण कधीच ते एकमेकांना सोडून जात नाहीत. लग्नाच्या वेळेस मात्र बहिण भावाला सोडून सासरी जाते. तेव्हा भावाचे डोळे पाणावतात. असाच एक प्रसंग बंधन या चित्रपटात दाखवला आहे. १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात सलमान खान आणि जॅकी श्रॉफ यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. सलमान खान बहिणीच्या लग्नानंतर तिच्या सासरच्या घरी जातो. अश्विनी भावेने या चित्रपटात सलमान खानच्या बहिणीची भूमिका साकारली आहे. चित्रपटात भाऊ आणि बहिण यांच्यामधील नातं दाखवण्यात आलं आहे.

जोश

मित्राची बहिण ही आपली पण बहिणचं असते. मात्र प्रेम हे नकळत होतं हयात आपण आधी समोरच्या व्यक्तीचं नातं काय आहे याची तपासणी करत बसत नाही. असाच एक चित्रपट म्हणजे जोश. अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांचा २००० साली जोश चित्रपट सुपरहिट ठरला होता.

Bollywood Movies On Raksha Bandhan
KBC 16 : महाभारतातील फक्त एका प्रश्नाचं उत्तर आलं नाही, स्पर्धकानं २५ लाख गमावले

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com