World Championship Of Legends: पठाण ब्रदर्स लाईव्ह सामन्यात मैदानावरच भिडले! पाहा नेमकं काय घडलं? VIDEO

Irfan Pathan- Yusuf Pathan Fight: भारतीय संघातील स्टार खेळाडू इरफान पठाण आणि युसुफ पठाण मैदानावरच भिडल्याचे पाहायला मिळाले आहे.
World Championship Of Legends: पठाण ब्रदर्स लाईव्ह सामन्यात मैदानावरच भिडले! पाहा नेमकं काय घडलं? VIDEO
irfan pathan yusuf pathantwitter
Published On

इंग्लंडमध्ये वर्ल्ड क्रिकेट गाजवणाऱ्या दिग्गद क्रिकेटपटूंची वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत भारताचे दिग्गज खेळाडू इरफान पठाण आणि युसुफ पठाणची जोडी मैदानावर उतरली आहे. हे दोघेही खेळाडू भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करताना दिसून येत आहे. दरम्यान लाईव्ह सामन्यात या दोघांमध्येच बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले आहे. रन आऊट झाल्यामुळे इरफान पठाण युसुफ पठाणवर संताप व्यक्त करताना दिसून आला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या स्पर्धेत इंडिया चॅम्पियन्स आणि दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स हे दोन्ही संघ आमनेसामने होते. या सामन्यात इंडिया चॅम्पियन्स संघाला विजय मिळवण्यासाठी २११ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इंडिया चॅम्पियन्स संघाला ५४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. इंडिया चॅम्पियन्स संघाची फलंदाजी सुरु असताना १९ व्या षटकात इरफान पठाण आणि युसुफ पठाणची जोडी मैदानावर होती.

World Championship Of Legends: पठाण ब्रदर्स लाईव्ह सामन्यात मैदानावरच भिडले! पाहा नेमकं काय घडलं? VIDEO
IND vs ZIM,3rd T20I: इथंच सामना फिरला.. शुभमन गिलने सांगितला भारत- झिम्बाब्वे सामन्यातील टर्निंग पॉईंट

त्यावेळी इरफान पठाणने शॉट मारला, जो हवेत गेला. दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स संघातील खेळाडू झेल घेण्यासाठी धावले. मात्र त्यांना काही झेल घेता आला नाही. मात्र तरीदेखील त्यांना इरफान पठाणला बाद करण्यात यश आलं. कारण दोन्ही भावांमध्ये ताळमेळ पाहायला मिळाला नाही. चेंडू हवेत गेल्यानंतरच इरफान पठाणला दुसरी धाव हवी होती. इरफान पठाणने युसुफ पठाणला धाव घेण्याचा इशाराही केला. मात्र युसुफ पठाणने नकार दिला.

World Championship Of Legends: पठाण ब्रदर्स लाईव्ह सामन्यात मैदानावरच भिडले! पाहा नेमकं काय घडलं? VIDEO
ZIM vs IND 3rd T20: मराठमोळ्या ऋतु 'राज'चा रूद्रावतार; झिम्बाब्वेला दिलं १८३ धावांचे तगडं आव्हान

इरफान पठाण अर्ध्या क्रिझपर्यंत पोहोचला होता. मात्र युसुफने शेवटी नकार दिल्याने त्याला मागे जाता आलं नाही. त्यामुळे तो धावबाद झाला. त्याला माहित होतं की, चूक ही युसुफ पठाणची आहे. त्यामुळे तो युसुफ पठाणवर संताप व्यक्त करताना दिसून आला. संताप व्यक्त करुन त्याने पॅव्हेलियनची वाट धरली.

मात्र तो बाद होण्याचा सामन्यावर फारसा काही फरक पडणार नव्हता. कारण इंडिया चॅम्पियन्स संघाला २ षटकात जिंकण्यासाठी ८० हून अधिक धावांची गरज होती. हे दोघे शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावर टिकून राहिले असते. तरीही सामना जिंकू शकले नसते. डोंगराइतक्या धावांचा पाठलाग करताना युसुफ पठाणने तुफानी अर्धशतकी खेळी केली. तर इरफान पठाणने २१ चेंडूंचा सामना करत ३५ धावा चोपल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com