
सांगलीच्या हर्षल पाटील या कंत्राटदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र हर्षलवर आत्महत्येची वेळ का आली? या आत्महत्येला सरकार जबाबदार असल्याचं का म्हटलं जातंय? आणि सरकारने या आत्महत्येवर कसे हात झटकले आहेत? हे आपण या स्पेशल रिपोर्टमधून पाहणार आहोत...
प्रत्येकाला पिण्याचं स्वच्छ पाणी मिळावं यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जल जीवन मिशन सुरु करण्यात आलं. मात्र या योजनेच काम पूर्ण करुनही सांगलीतील हर्षल पाटील या कंत्राटदाराने तब्बल १ कोटी ४० लाखांचं थकित बिल आणि वाढत्या कर्जामुळे थेट गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय. तर काम पूर्ण करुनही सरकारने वर्षभरापासून थकलेलं बिल न दिल्यानेच हर्षलने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय.
थकित बिलामुळे हर्षल पाटीलने आत्महत्या केल्याचं समोर आल्यानंतर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना हात झटकलेत. एवढंच नाही तर कंत्राटदारांचे कुठलेही पैसे थकले नसल्याचा दावा केलाय. मात्र कंत्राटदार संघटनेनं मंत्र्यांच्या दाव्याची पोलखोल केलीय.
राज्यात गेल्या एक वर्षांपासून लाडकी बहीण योजना राबवली जातेय. यासारख्याच लोकप्रिय योजनांमुळे राज्यावर तब्बल ९ लाख ३२ हजार कोटींचं कर्ज झालंय. तर वित्तीय तूट १ लाख ३२ हजार कोटींच्या वर गेलीय. राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे... त्यामुळे ऑक्टोबर २०२४ पासून कंत्राटदारांचे जलजीवन मिशनचे ३५ हजार ६२२ कोटी थकित असल्याचं समोर आलंय. तर याच थकित बिलांमुळे कंत्राटदारांसाठी जलजीवन मिशन हे जलजीवघेणं मिशन बनतंय का? हाच प्रश्न निर्माण झालाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.