Surabhi Jayashree Jagdish
भरभराटीच्या दृष्टीने आज दिवस चांगला आहे. घरामध्ये काहीतरी नवी खरेदी होईल.
कलाकार लोकांना विशेष कामाच्या संधी मिळतील. दिवस चांगला आहे.
सगळे ऑलवेल चालू आहे म्हणता म्हणता एखादी गोष्ट मध्ये येणार आहे. आज जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या.
तुमच्या लक्षात येत नाही पण आज मात्र स्वतःला प्राधान्य देऊन कामे कराल. कामाच्या ठिकाणी लाभ होण्याची शक्यता आहे.
ठरवाल ते कराल अशा गोष्टी असणारी आपली रास आहे. पण आज या सगळ्याला खिळ बसेल असे दिसते आहे.
बौद्धिकता ठासून भरलेली आपली रास आहे. गोड बोलण्यामुळे व्यवहार ज्ञान उत्तम असल्यामुळे अनेक लोकांना आज जवळ कराल.
कामाच्या बाबतीत आज भ्रमंती होईल. वाहन सौख्याला मात्र दिवस चांगला आहे.
कुलस्वामिनीची उपासना आज फलदायी ठरेल. अनेक कामे एकट्याने आणि नेटाने करावे लागेल.
दोलायमान मनस्थिती राहणार आहे. कोणाच्या तरी मार्गदर्शनाची किंवा कुणीतरी आपल्याला सल्ला द्यावा अशी मानसिकता आपली आज तयार होईल.
कोणाच्या सहकार्याशिवाय सुद्धा तुम्हाला पुढे जावे लागलेले आहे. आज मात्र व्यावसायिक भागीदाराचे सहकार्याने कामाचा मोठा पल्ला पार पाडाल.
विनाकारण शारीरिक, मानसिक, आर्थिक ताण याच्यामुळे तब्येत ढासळेल. तरीसुद्धा काम करत राहावे लागेल.
शेअर्समध्ये प्रगती होईल. आपल्यामधील सुप्त गुणांना आज भाव मिळणार आहे. सृजनशीलता वाढेल.