Movie Releases Saam Tv
मनोरंजन बातम्या

Movie Releases: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी रिलीज झाले जबरदस्त चित्रपट, 'स्त्री २' की 'खेल खेल में' कोण करणार जबरदस्त ओपनिंग?

Bollywood Film: बॉलिवूडचा बहुप्रतिक्षित 'स्त्री 2', 'वेदा' या चित्रपटाव्यतिरिक्त अक्षय कुमारचा 'खेल खेल में' हे चित्रपट आज प्रदर्शित झाले. या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते.

Priya More

भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त चित्रपटसृष्टी प्रेक्षकांना एक अद्भुत सिनेमॅटिक अनुभव देणार आहे. बॉलिवूडचा बहुप्रतिक्षित 'स्त्री 2', 'वेदा' या चित्रपटाव्यतिरिक्त अक्षय कुमारचा 'खेल खेल में' हे चित्रपट आज प्रदर्शित झाले. या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. याशिवाय देशातील विविध भाषांमध्ये देखील अनेक चांगले चित्रपट प्रदर्शित होत आहेत. आज सर्वांना सुट्टी असून तुम्ही फॅमिलीसोबत हे चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकता. आज कोण-कोणते चित्रपट रिलीज झाले ते आपण पाहणार आहोत...

स्त्री २ -

अमर कौशिक दिग्दर्शित 'स्त्री 2' हा बहुप्रतिक्षित चित्रपट आज रिलीज झाला. या चित्रपटामध्ये श्रद्धा कपूर, राजकुमार राव आणि अपारशक्ती खुराना हे मुख्य भूमिकेत आहेत. या हॉरर-कॉमेडी सिक्वेलमध्ये 'सर कटा भूत' नावाची एक नवीन अलौकिक शक्ती प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट पाहून प्रेक्षक हसतील ही आणि त्यांना भीती देखील वाटेल. 'भेडिया'मध्ये दिसलेला वरुण धवन या चित्रपटात खास भूमिकेत आहे.

वेदा -

निखिल अडवाणी दिग्दर्शित 'वेदा' हा एक ॲक्शन-पॅक थ्रिलर चित्रपट आज रिलीज झाला. हा चित्रपट एका मनोरंजक कथेसह सामाजिक समस्यांवर भाष्य करतो. जॉन अब्राहम, तमन्ना भाटिया आणि शर्वरी वाघ अभिनित हा चित्रपट एका माजी लष्करी अधिकाऱ्याच्या कथेवर केंद्रित आहे. जो एका तरुणीला जातीय भेदभाव आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध लढायला शिकवतो.

थंगलान -

पा. रंजित दिग्दर्शित तमिळ चित्रपट 'थंगलान' हे एक ऐतिहासिक नाटक आहे. ज्यामध्ये दक्षिणेचा सुपर हिरो विक्रम मुख्य भूमिकेत आहे. ब्रिटिश राजवटीत कोलार गोल्ड फील्डमधील कामगारांच्या शोषणावर हा चित्रपट प्रकाश टाकतो. विक्रमसोबत मालविका मोहनन आणि पार्थिव तिरुवोथू या चित्रपटात दिसणार आहेत. नेटफ्लिक्सने या चित्रपटाचे स्ट्रीमिंग अधिकार आधीच विकत घेतले आहेत.

खेल खेल मे -

रवी उदयवार दिग्दर्शित 'खेल खेल में' या बॉलिवूड ॲक्शन फिल्ममध्ये अक्षय कुमार, तापसी पन्नू, वाणी कपूर, फरदीन खान, एमी विर्क आणि आदित्य सील हे मुख्य भूमिकेत आहेत. 'परफेक्ट स्ट्रेंजर्स' या इटालियन चित्रपटाचा हा रिमेक आहे. चित्रपटामध्ये सर्व मित्र एकत्र येत एक गेम खेळतात. प्रत्येक जण आपला मोबाईल अनलॉक करून सर्वांसमोर ठेवतात. या गेममध्ये अनेक गोष्टी सर्वांसमोर उघड होतात.

मिस्टर बच्चन -

हरीश शंकर दिग्दर्शित 'मिस्टर बच्चन' हा चित्रपट तेलुगू चित्रपटसृष्टीतच प्रदर्शित होत आहे. रोमँटिक ॲक्शन चित्रपटात रवी तेजा मुख्य भूमिकेत आहे. भाग्यश्री बोरसे ही या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसत आहे. चित्रपटाची कथा आणि स्टार कास्ट तेलुगू चित्रपटाच्या चाहत्यांसाठी खूपच खास ठरणार आहे. .

अंधागन -

बॉलिवूडचा जबरदस्त चित्रपट 'अंधाधुन'चे तमिळ रूपांतर 'अंधागन' देखील १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन थियाराजन यांनी केले आहे. मूळ चित्रपटातील सस्पेन्स आणि थरारक घटकांसह कलाकारांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. सस्पेन्स आणि रहस्याच्या चाहत्यांसाठी ‘अंधगन’ नक्कीच एक उत्तम सिनेमॅटिक अनुभव देईल.

Demonte Colony 2 -

तमिळ चित्रपटसृष्टीत सुपरहिट चित्रपट 'Demonte Colony' या चित्रपटाचा सिक्वेल 'Demonte Colony 2' या हॉरर चित्रपट आज रिलीज झाला. या चित्रपटाच्या पहिल्या पार्टने प्रेक्षकांना प्रचंड घाबरवले. तेलुगु सिनेमाच्या चाहत्यांसाठी 'डबल आयस्मार्ट' हा राम पोथीनेनी आणि बॉलीवूडचा ज्येष्ठ अभिनेता संजय दत्त यांच्या प्रमुख भूमिका असलेला ॲक्शन चित्रपट आहे. पुरी जगन्नाथ दिग्दर्शित हा चित्रपट एका खुन्याची कथा सांगतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT