India VS Pakistan Final: आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयाचा आनंद संपूर्ण देशात साजरा करण्यात येत आहे. अनेक क्रिकेटप्रेमी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय संघाचे कौतुक करत आहेत. क्रिकेटप्रेमींप्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही सोशल मीडियावरून भारतीय संघाचे कौतुक केले आणि आनंद व्यक्त केला.
अभिनेता पुष्कर जोगने विजयाच्या निमित्ताने पाकिस्तानवर उपहासात्मक टीका करताना लिहिले की, "आम्ही सुद्धा ठोकतो पण मैदानात, लोकांना नाही… पाकिस्तानवर सगळीकडून बंदी घालावी." अभिजीत केळकरनेदेखील विनोदी शैलीत प्रतिक्रिया देत "ऑपरेशन सिंदूरनंतर ऑपरेशन तिलक" असे म्हटले.
संगीतकार सलील कुलकर्णीने सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांची कामगिरी अधोरेखित करत "तिलक हा खरंच हिरा आहे" असे कौतुक केले. अभिनेत्री विदीशा म्हसकरने पाकिस्तानच्या पराभवाची खिल्ली उडवत लिहिले, "पाकिस्तानवाले प्रत्येकवेळी शेवटी येऊनच कसे हरतात?" पूजा सावंतने "चॅम्पियन्स" असे म्हणत संघाच्या यशाचा अभिमान व्यक्त केला, तर सिद्धार्थ चांदेकरने "Bleed Blue" हा संदेश देत भारतीय संघाच्या पाठिशी उभा असल्याचे दर्शवले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरच्या पार्श्वभूमीवर झालेला हा विजय आणखी महत्त्वाचा ठरला असून, मराठी कलाकारांच्या प्रतिक्रियांमधून संघाबद्दलचा अभिमान आणि राष्ट्राभिमान स्पष्टपणे दिसून आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.