Actress Son Death: धक्कादायक! अभिनेत्रीच्या २ मुलांचा दुर्दैवी मृत्यू, शॉर्ट सर्किटमुळे गमावला जीव; मनोरंजनविश्वात शोककळा

Actress Son Passes Away: अभिनेत्री रीता शर्मा यांच्या आयुष्यात मोठा आघात झाला आहे. अभिनेत्रीच्या दोन मुलांचा शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत मृत्यू झाला.
Actress Son Death
Actress Son DeathSaam Tv
Published On

Actress Son Passes Away: अभिनेत्री रीता शर्मा यांच्या आयुष्यात मोठा आघात झाला आहे. राजस्थानमधील कोटा येथे त्यांच्या दोन मुलांचा शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत मृत्यू झाला. ही घटना अत्यंत हृदयद्रावक असून स्थानिक पातळीवर तसेच मनोरंजनविश्वातही शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा रीता शर्मा यांच्या घरात अचानक शॉर्ट सर्किट झाले. त्यातूनच भीषण आग लागली आणि काही क्षणांतच घर धुराने व ज्वाळांनी व्यापले गेले. त्या वेळी घरात रीता शर्मा यांचे दोन मुलं झोपलेले होते. अचानक आग लागल्याने त्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. परिसरातील लोकांनी मदत करण्याचा प्रयत्न केला, तसेच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत परिस्थिती गंभीर झाली आणि प्रयत्न करूनही मुलांचे प्राण वाचवता आले नाहीत.

Actress Son Death
Thalapathy Vijay: 'करूरमध्ये जीव गमावलेल्या माझ्या भावा-बहिणी...'; रॅलीतील चेंगराचेंगरीनंतर अभिनेता विजय यांची पहिली प्रतिक्रिया

या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शेजाऱ्यांनी सांगितले की, आग एवढ्या वेगाने पसरली की कोणी काही करू शकले नाही. मुलं धुरामुळे बेशुद्ध झाली आणि त्यानंतर त्या ज्वाळांमध्ये अडकली. रीता शर्मा स्वतः मराठी आणि हिंदी मनोरंजन सृष्टीशी संबंधित असून, त्यांनी अनेक मालिकांमध्ये आणि काही चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. दोन मुलांचा मृत्यू हा आईसाठी असह्य धक्का आहे.

Actress Son Death
Actor scandal: किसिंग सीन करताना प्रसिद्ध अभिनेत्याचा ताबा सुटला; 16 वर्षांच्या 'या' अभिनेत्रीला जबरदस्ती केलं किस
https://www.bhaskarenglish.in/local/rajasthan/video/kota-flat-fire-brothers-die-elder-iit-student-younger-child-actor-suffocated-short-circuit-pathar-mandi-investigation-136035852.html?type=video

या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने पंचनामा केला असून, शॉर्ट सर्किटमुळेच आग लागल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. तरीही या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मनोरंजनविश्वातील कलाकारांनी आणि सहकाऱ्यांनी सोशल मीडियावरून रीता शर्मा यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. चाहत्यांनी देखील शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. "ही आईची वेदना शब्दांत मांडता येत नाही," अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com