Thalapathy Vijay: 'करूरमध्ये जीव गमावलेल्या माझ्या भावा-बहिणी...'; रॅलीतील चेंगराचेंगरीनंतर अभिनेता विजय यांची पहिली प्रतिक्रिया

Vijay Rally Stampede: टीव्हीके पक्षाचे प्रमुख आणि लोकप्रिय दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेते विजय थलापथी यांच्या करूर रॅलीत चेंगराचेंगरी झाली. यात ३९ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. विजय यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.
Vijay Rally Stampede
Vijay Rally StampedeSaam Tv
Published On

Vijay Rally Stampede: शनिवारी विजय थलापथी यांच्या राजकीय रॅलीत चेंगराचेंगरी झाली, त्यामुळे ३९ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहेत. विजय या घटनेने खूप दुःखी झाले आहेत आणि त्यांनी या घटनेनंतर ट्विट केले. विजय थलापथीसह रजनीकांत आणि कमल हासन यांनीही त्यांचे दुःख व्यक्त केले.

घटनेनंतर विजय यांचे पहिले ट्विट

विजय यांनीही रॅलीतील चेंगराचेंगरीबद्दल ट्विट केले. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर लिहिले की, "माझे हृदय तुटले आहे. मी वेदना आणि दुःखाच्या अवर्णनीय स्थितीत आहे. शब्दात ते वर्णन करता येत नाही. करूरमध्ये जीव गमावलेल्या माझ्या भावा-बहिणींच्या कुटुंबियांबद्दल मी माझ्या मनापासून संवेदना आणि सहानुभूती व्यक्त करतो. रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांच्या लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो."

Vijay Rally Stampede
The Bads Of Bollywood: आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'चा दुसरा सीझन कधी येणार? वेब सिरीजमधील अभिनेत्याने केला खुलासा

रजनीकांत आणि कमल हासन शोक व्यक्त केला

तामिळनाडूतील करूर येथे विजय थलापथी यांच्या राजकीय रॅलीत चेंगराचेंगरी आणि मृत्युंबद्दल अनेक दक्षिण भारतीय कलाकारांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. रजनीकांत आणि कमल हासन यांनाही त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शोक व्यक्त केला. रजनीकांत यांनी लिहिले की, "करूरमधील घटनेची आणि निष्पाप लोकांच्या मृत्यूची बातमी हृदयद्रावक आहे. ही खूप दुःखद बातमी आहे. मृतांच्या कुटुंबियांबद्दल माझी तीव्र संवेदना."

Vijay Rally Stampede
OG Box Office: पवन कल्याण आणि इमरान हाश्मीच्या चित्रपटाने रचला नवा विक्रम; दोन दिवसात १०० कोटी क्लबमध्ये एंट्री

कमल हासन यांनी असेही ट्विट केले की, "माझे हृदय हेलावून गेले आहे. करूरमधून येणारी बातमी धक्कादायक आणि दुःखद आहे. जीव गमावलेल्या निष्पाप लोकांबद्दल माझ्याकडे संवेदना व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. चेंगराचेंगरीतून वाचलेल्यांना योग्य उपचार मिळावेत याची खात्री करण्यात यावी अशी मी तामिळनाडू सरकारला विनंती करतो."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com