OG Box Office: पवन कल्याण आणि इमरान हाश्मीच्या चित्रपटाने रचला नवा विक्रम; दोन दिवसात १०० कोटी क्लबमध्ये एंट्री

OG Box Office: साऊथ सुपरस्टार आणि आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण व बॉलिवूडचा सिरियल किसर इमरान हाश्मी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘दे कॉल हिम ओजी’ चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत तुफानी कमाई करत आहे.
OG Box Office
OG Box OfficeSaam Tv
Published On

OG Box Office: साऊथ सुपरस्टार आणि आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण व बॉलिवूडचा सिरियल किसर इमरान हाश्मी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘दे कॉल हिम ओजी’ चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत तुफानी कमाई करत आहे. गुरुवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ६३ कोटींचा टप्पा पार केला होता. इतकंच नव्हे तर रिलीजपूर्वीच्या प्रीमियर शोमधूनही तब्बल २१ कोटींची भर पडली होती.

दुसऱ्या दिवशी सॅकनिल्कच्या अहवालानुसार ‘ओजी’ने आणखी १९.२४ कोटींची कमाई केली असून केवळ दोन दिवसांत १०३.९९ कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. इतक्या कमी वेळात १०० कोटींचा आकडा पार करणारा हा पवन कल्याणचा विक्रमी चित्रपट ठरला आहे.

OG Box Office
Raj Kundra: १५० कोटींचे बिटकॉईन, ईडीने फास आवळला, राज कुंद्राच्या विरोधात चार्जशीट दाखल

चित्रपटाच्या रिलीजसोबतच अनेक विक्रम मोडीत निघाले आहेत. सोशल मीडियावर ‘ओजी’बद्दल जबरदस्त चर्चा रंगली असून सिनेमागृहात या चित्रपटासाठी प्रेक्षकांची तुफानी गर्दी होत आहे. पवन कल्याण आणि इमरान हाश्मी यांची जोडी, अॅक्शन सीन, दमदार डायलॉग्ज आणि कथानकामुळे चित्रपटाने केवळ साऊथमध्येच नाही तर संपूर्ण भारतात आपली छाप सोडत आहे.

OG Box Office
Thamma Trailer: मेरा बेटा शैतान है...; हॉरर युनिव्हर्समध्ये आयुष्मान-रश्मिकाची एंट्री, थामाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

सुजीत दिग्दर्शित 'ओजी'मध्ये प्रियांका मोहन, श्रीया रेड्डी, अर्जुन दास आणि प्रकाश राज यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट ओजस गंभीरा (पवन) नावाच्या एका गुंडाभोवती फिरतो, जो दहा वर्षांनंतर दुसऱ्या गुन्हेगार ओमी भाऊ (इमरान) ला मारण्यासाठी मुंबईत परततो. प्रदर्शित होताच या चित्रपटाने प्रचंड चर्चा निर्माण केली, कारण हा चित्रपट पवन कल्याणचा शेवटचा चित्रपट असण्याची अपेक्षा आहे. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री असलेले हे अभिनेता राजकारणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी चित्रपटांपासून दूर जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com