Thamma Trailer: बॉलिवूडचे बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘थामा’चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांना ट्रेलर फारचं आवडला आहे. आयुष्मान खुराना, रश्मिका मंदाना आणि नवाजुद्दीन सिद्दिकी यांसारख्या बहुआयामी कलाकारांना घेऊन मॅडॉक फिल्म्सने आपल्या हॉरर-कॉमेडी युनिव्हर्सचा आणखी एक चित्रपट आणला आहे.
ट्रेलरच्या सुरुवातीपासूनच हलक्या-फुलक्या संवादांमुळे एक वेगळं वातावरण रंगतं. पण जसजसा ट्रेलर पुढे जातो, तसतसे अकल्पित थरारक क्षण उभे राहतात. कॉमेडी आणि हॉरर यांचा हा उत्तम संगम प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. त्यात रोमँसचा तडका दिल्याने या चित्रपटाचा ट्रेलर आणखी खास झाला आहे.
आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना इंम्प्रेस करायला पुरेशी आहे. त्यात नवाजुद्दीन सिद्दिकींची रहस्यमय एन्ट्री आणि परेश रावलची कॉमेडी चित्रपटाला वजनदार बनवते. याआधी ‘स्त्री’, ‘भेडीया’ आणि ‘मुंज्या’सारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन केले होते. या युनिव्हर्समध्ये ‘थामा’ची एंट्री झाली आहे.
मॅडॉक फिल्म्स निर्मित आणि आदित्य सरपोतदार दिग्दर्शित "थामा" हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर २१ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटात आयुष्मान खुराना, रश्मिका मंदान्ना, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि परेश रावल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.