Shruti Vilas Kadam
विद्या बालनने नवरात्रीनिमित्त सुंदर साडी परिधान केलेले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
विद्याने या फोटोशूटसाठी हिरवी साडी परिधान केली असून त्यावर साजेसा मेकअप आणि केसांचा साधा बन बांधून लूक पूर्ण केला आहे.
विद्या बालन ही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात बहुगुणी आणि दमदार अभिनेत्रींपैकी एक आहे.
२००५ मध्ये ‘परिणीता’ चित्रपटातून तिने हिंदी सिनेमात पदार्पण केले आणि पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
‘कहानी’, ‘तुम्हारी सुलु’, ‘डर्टी पिक्चर’ अशा चित्रपटांमधून तिने महिलांच्या प्रभावी आणि मजबूत व्यक्तिरेखा साकारल्या.
‘द डर्टी पिक्चर’मधील सिल्क स्मिता या भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
विद्या बालन पारंपरिक साड्यांसाठी आणि भारतीय लूकसाठी विशेष प्रसिद्ध आहे. तिचा ड्रेसिंग सेन्स आणि साड्यांचे कलेक्शन नेहमीच चाहत्यांना इंम्प्रेस करतात.