Rakul Preet Singh Saam TV
मनोरंजन बातम्या

Rakul Preet Singh: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला झटका, आयकर विभागाकडून घरासह १२ ठिकाणी छापेमारी, नेमकं प्रकरण काय?

Rakul Preet Singh: बॉलिवूडशी संबंधित आर्थिक व्यवहारांवर आयकर विभागाच्या कथित कारवाईची चर्चा सुरू आहे. रकुल प्रीत सिंग, वाशु भगनानी आणि पॅनोरामा स्टुडिओजशी संबंधित ठिकाणांचा तपास सुरू असल्याचे वृत्त आहे.

Shruti Vilas Kadam

Rakul Preet Singh: बॉलिवूडशी संबंधित काही व्यक्ती आणि प्रॉडक्शन कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांबाबत आयकर विभागाकडून तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्री रकुल प्रीत सिंग, ज्येष्ठ चित्रपट निर्माते वाशु भगनानी आणि पॅनोरामा स्टुडिओज यांच्याशी संबंधित ठिकाणी आयकर विभागाच्या पथकांकडून शोधमोहीम सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या कारवाईबाबत अधिकृत तपशील किंवा संबंधितांकडून प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार,आयकर विभागाकडून अभिनेत्रीच्या घरासह मुंबईतील सुमारे १२ ठिकाणी तपास केला जात असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपट निर्मिती, चित्रीकरण, परदेशातील वितरण आणि इतर मनोरंजनविषयक व्यवहारांशी संबंधित आर्थिक नोंदी तपासल्या जात असल्याची माहिती आहे.

परदेशातील व्यवहारांबाबत संशय?

आजतकच्या माहितीनुसार, चित्रपटांच्या निर्मिती आणि परदेशातील वितरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर निधी परदेशात वळवण्यात आला आहे का, याची चौकशी केली जात असल्याचे सांगितले जात आहे. या व्यवहारांमध्ये टॅक्सशी संबंधित नियमांचे उल्लंघन किंवा आर्थिक अनियमितता झाली आहे का, याचा तपास आयकर विभाग करत असल्याचा दावा आहे.

रकुल प्रीत सिंग चर्चेत

या प्रकरणात अभिनेत्री रकुल प्रीत सिंगचे नाव समोर आले आहे. रकुलने हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम केले आहे. सध्या ती रणबीर कपूरच्या ‘रामायण’ या चित्रपटातील महत्वपूर्ण भूमिकेमुळेही चर्चेत आहेत. या चित्रपटात ती शूर्पणखेची भूमिका साकारत आहे.

वाशु भगनानी आणि पॅनोरामा स्टुडिओज

अभिनेत्री रकुल प्रीत सिंगचे सासरे आणि निर्माते वाशु भगनानी हे पूजा एंटरटेनमेंटशी संबंधित असून त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांची निर्मिती केली आहे. तर पॅनोरामा स्टुडिओज इंटरनॅशनल ही चित्रपट निर्मिती, वितरण आणि संबंधित मनोरंजन व्यवसायात कार्यरत कंपनी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात आणखी एका 'वैष्णवी'सोबत भयंकर घडलं, ५ लाखांच्या कारसाठी सासरच्यांकडून छळ

संपूर्ण गावच विक्रीला काढलं! ग्रामस्थांचा टोकाचा निर्णय

Homemade Honey Recipe : बाजारातलं महागडं मध खरेदी करणं सोडा, घरच्या घरी फक्त ३ पदार्थांपासून 'असे' बनवा शुद्ध मध!

Maharashtra News Live Update: उज्जैनमध्ये शाही मस्जिदचा वाद पेटला पोलिसांकडून लाठी चार्ज

Sanjay Raut: खासदार संजय राऊतांचे FDA अधिकाऱ्यांवर खळबळजनक आरोप; थेट तुकाराम मुंढेंना पत्र धाडलं

SCROLL FOR NEXT