Raju Srivastava Instagram Instagram/@rajusrivastavaofficial
मनोरंजन बातम्या

Raju Srivastava Health Update | राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीबाबत आली महत्वाची अपडेट

Raju Srivastava Health Update | राजू श्रीवास्तवच्या भावाने दिलेली ही माहिती कुटुंब आणि चाहत्यांसाठी आंनदाची आहे.

Nandkumar Joshi

मुंबई: कॉमेडियन राजू श्रीवास्तववर (Raju Srivastava) गेल्या अनेक दिवसांपासून एम्स रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याच दरम्यान राजूच्या प्रकृतीबाबत अनेक नवीन अपडेट समोर आल्या आहेत. अलीकडेच राजूच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, तो शुद्धीवर आल्याचे वृत्त समोर आले होते. यानंतर राजूची प्रकृती स्थिर असून हळूहळू बरा होत आहे, असा विश्वास राजू श्रीवास्तवचे कुटुंब, मित्रमंडळी, तसेच निकटवर्तीयांनी व्यक्त केला होता. राजू श्रीवास्तवच्या भावाने प्रकृतीबाबत मोठी अपडेट दिली आहे. राजू श्रीवास्तवच्या भावाने दिलेली ही माहिती कुटुंब आणि चाहत्यांसाठी आंनदाची आहे. (Raju Srivastava Latest News)

हे देखील पाहा -

राजू श्रीवास्तवची प्रकृती स्थिर असून हृदयाचे ठोके, ब्लड प्रेशर आणि ऑक्सिजन पातळी सामान्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. यामुळे राजू श्रीवास्तवचे व्हेटिंलेटर हटवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, असे राजू श्रीवास्तवच्या भावाने सांगितले आहे.

राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीत सतत चढउतार होत आहेत. अलीकडेच प्रकृतीत सुधारणा होत असताना डॉक्टरांनी राजूला व्हेंटिलेटवरून काढण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पुन्हा त्याला ताप आल्याने डॉक्टरांनी व्हेटिंलेटरवरून काढण्याचा निर्णय मागे घेतला आहे. सध्या राजूचे शरीर व्यवस्थित काम करत आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, डॉ. पद्मा श्रीवास्तव आणि डॉ. अचल श्रीवास्तव दिल्लीत एम्समध्ये राजूवर उपचार करत आहेत. यापूर्वी दोन वेळा राजूला व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले होते. मात्र काही वेळाने पुन्हा त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. एक महत्वाची गोष्ट म्हणजे राजू श्रीवास्तव आता ९० टक्के ऑक्सिजन नैसर्गिकरित्या घेत आहे. यामुळेच हा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.

राजू श्रीवास्तवला मागील महिन्यात एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून तो शुद्धीवर आला नाही. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, डॉक्टरांनी मंगळवारी राजूचे व्हेंटिलेटर काही वेळासाठी काढले होते. १४ ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तवला ताप आला आणि तो ३ दिवसांनी कमी झाला. त्यानंतर राजूच्या मेंदूला संसर्ग झाले असल्याची माहिती समोर आली. यामुळे पुन्हा राजूच्या प्रकृतीबाबत चिंता वाढली. मात्र आता राजूच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे दिसते आहे. राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीत सुधारणा होऊन लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी संपूर्ण देशभरातील त्याचे चाहते आणि कुटुंबीय प्रार्थना करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं रेकॉर्डब्रेक महागलं! प्रति तोळा इतकी झाली वाढ, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी, जाणून घ्या राशीभविष्य

High Blood Pressure: रोजच्या धावपळीत ताण-थकवा येतोय; दुर्लक्ष करणं पडेल महागात, BPसोबत वाढतील 'या' समस्या

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

पुण्यात गुन्हेगारांना तिकिट देणं आवडलं नाही, फडणवीसांनी अजित पवारांना सुनावले

SCROLL FOR NEXT