IMDb Reveals Best Indian Movies And Shows Saam TV
मनोरंजन बातम्या

Best Indian Movies - Web Series in 2023 : यंदा रँकिंगमध्ये कोणते चित्रपट, वेबसीरिज ठरल्या अव्वल, यादी आली समोर

Pooja Dange

IMDb Reveals Best Indian Movies And Shows : 2023 हे अर्धे झाले पुर्ण झाले असताना IMDb (www.imdb.com), या चित्रपट, टिव्ही शोज आणि सेलिब्रिटीजवरील जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय माहितीचा स्रोत असलेल्या साईटने जगभरातील IMDb युजर्ससाठी 2023 मधील आत्तापर्यंतच्या सर्वाधिक प्रसिद्ध असलेल्या कलाकृतींची घोषणा केली आहे.

10 भारतीय चित्रपट आणि वेबसीरीजची घोषणा केली आहे. IMDb साईटवर दर महिन्याला येणा-या 20 कोटींहून अधिक विझिटर्सच्या पेज व्ह्यूजच्या आधारे IMDb ने ही यादी बनवली आहे.

“थिएटरमध्ये येणारे आणि थेट स्ट्रीम रिलीज होणारे असे दोन्ही‌कडे प्रदर्शित झालेल्या कलाकृतीं या यादीमध्ये स्पर्धा करताना दिसत आहेत. (Latest Entertainment News)

गेल्या काही वर्षांमध्ये वितरणाची स्थिती बदलली आहे,” असे IMDb इंडियाच्या प्रमुख यामिनी पतोडिया यांनी म्हटले आहे. “आमचा एक्सक्लुझिव्ह डेटा वापरून जगभरातील आमच्या मनोरंजन चाहत्यांना आवडणा-या भारतीय स्टोरीज आणि क्रिएटर्सना समोर आणून सेलिब्रेट करण्याचे आमचे काम आम्ही पुढे सुरू ठेवू आणि काय बघावे हे शोधला आणि ठरवला त्यांची मदतही करू.”

2023 मधील (आत्तापर्यंतचे) सर्वांत प्रसिद्ध भारतीय चित्रपट

1. पठान

2. किसी‌का भाई किसी की जान

3. द केरला स्टोरी

4. तू झूठी मै मक्कार

5. मिशन मजनू

6. चोर निकल के भागा

7. ब्लडी डॅडी

8. सिर्फ एक बंदा काफी है

9. वारिसू

10. पोन्नियिन सेल्वन: पार्ट टू

पठानसह उत्साहाने पडद्यावर परत आलेल्या शाहरुख खानचा चित्रपट या वर्षातला आजपर्यंतचा सर्वांत प्रसिद्ध चित्रपट ठरला आहे. याविषयी बोलताना शाहरुख म्हणाला, “IMDb च्या यादीमध्ये पठान पहिल्या स्थानी आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे.

पठानला मिळालेले इतके प्रेम पाहून आनंद होतो आणि जेव्हा कधी कोणतीही कलाकृती सर्वोच्च स्थानी जाते, तेव्हा त्या व्यक्तीने अजून जास्त मेहनत घ्यायची असते आणि ही मान्यता मिळाल्याबद्दल प्रत्येकाला धन्यवादसुद्धा द्यायचे असतात. महत्त्वाचे म्हणजे मला पठानच्या टीमला आणि हे घडवून आणणा-या जगभरातील चाहत्यांना धन्यवाद द्यायचे आहेत!”

2023 मधील (आजपर्यंतच्या) सर्वांत प्रसिद्ध भारतीय वेब सिरीज

1. फर्जी

2. द नाईट मॅनेजर

3. राणा नायडू

4. जुबिली

5. असूर: वेलकम टू यूवर डार्क साईड

6. दहाड

7. साँस, बहू और फ्लेमिंगो

8. ताज़ा खबर

9. ताज: डिव्हाईडेड बाय ब्लड

10. रॉकेट बॉयज

फर्ज़ीसह वेबसीरीजमध्ये पदार्पण केलेल्या शाहीद कपूरने म्हटले आहे की, “फर्ज़ीला मिळालेल्या अपार प्रेमामुळे व समर्थनामुळे ती IMDb च्या 2023 मधील सर्वांत प्रसिद्ध भारतीय वेब सिरीजच्या यादीमध्ये पहिल्या स्थानी गेली आहे व त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.

या शोसाठी अथक परिश्रम करणा-या आमच्या संपूर्ण टीमच्या उल्लेखनीय मेहनतीला मिळालेला हा बहुमान आहे. या थरारक कहाणीसाठी मला आरजे आणि डीकेला धन्यवाद द्यायचे आहेत आणि जगभर फर्ज़ी प्रदर्शित केल्याबद्दल प्राईम व्हिडिओलाही धन्यवाद द्यायचे आहेत.

त्यातून मला मला जगभरात सर्वत्र असलेल्या माझ्या चाहत्यांपर्यंत व श्रोत्यांपर्यंत जाण्यासाठी अशा आकर्षक कहाण्यांवर पुढेही काम करण्याची प्रेरणा मिळत आहे.”

2023 मधील (आत्तापर्यंतचे) सर्वांत प्रसिद्ध भारतीय चित्रपट व वेबसीरीजबद्दल आणखी माहिती:

• थिएटरमध्ये रिलीज होणा-या मूव्हीजबरोबर स्ट्रीम होणा-या मूव्हीजनेही भारतीय प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले, ज्यामध्ये ब्लडी डॅडी (जिओसिनेमा) आणि चोर निकल के भागा (नेटफ्लिक्स) असे मुळात डिजिटलवर प्रसारित झालेले रिलीजसुद्धा पठान आणि किसी का भाई किसी की जान यांच्यासह एकाच यादीत होते

• वारीसू (क्र. 9) आणि पोन्नियिन सेल्वन: पार्ट टू (क्र. 10) यांनी या यादीमध्ये तमिळ चित्रपटसृष्टीचे प्रतिनिधित्व केले आहे.

• भारतातील स्ट्रीमिंगच्या चाहत्यांनी वर्षाच्या अर्ध्या भागामध्ये क्राईम ड्रामाला पसंती दिली व गुन्ह्यावर आधारित सीरीजना पहिल्या 10 पैकी 8 स्थाने मिळाली आहेत. त्यामध्ये अपवाद केवळ दोन वेगळ्या काळातील ड्रामा आहेत: ताज: डिव्हाईडेड बाय ब्लड आणि रॉकेट बॉयज.

• सर्वाधिक प्रसिद्ध वेबसीरीजमधील टायटल्स वेगवेगळ्या स्ट्रीमिंग सर्विसेसमधील आहेत व त्यामध्ये प्राईम व्हिडिओ आणि डिस्ने + हॉटस्टार यांचे प्रत्येकी तीन शोज आहेत तर जिओ सिनेमा/ व्हूट, झी5, नेटफ्लिक्स आणि सोनी लिव्ह यांचा प्रत्येकी एक शो आहे.

• IMDb “ब्रेकआउट स्टार" स्टारमीटर पुरस्कारांच्या अलीकडच्या विजेत्यांनी दोन सर्वांत प्रसिद्ध वेब सिरीजमध्ये महत्त्वाच्या भुमिका केल्या आहेत- भुवन अरोराने फर्ज़ीमध्ये आणि अंगिरा धरने साँस, बहू और फ्लेमिंगोमध्ये काम केले आहे.

भारतामध्ये 1 जानेवारी ते 3 जुलै 2023 या कालावधीमध्ये रिलीज झालेल्या सर्व चित्रपट व वेबसीरीजमध्ये आणि किमान 5,000 व्होटससह सरासरी IMDb रेटिंग 5 किंवा अधिक असलेल्या या टायटल्सना जगभरातील IMDb वरील दर महिन्याला सुमारे 20 कोटी व्हिजिटर्सच्या पेज व्ह्यूजनुसार सर्वाधिक लोकप्रियता मिळाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

Maharashtra News Live Updates: देशातील सर्वात भ्रष्ट परिवार म्हणजे काँग्रेसमधील शाही परिवार - मोदी

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेला मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार!

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

PM Modi Speech: 'काँग्रेसने एससी, एसटी ओबीसींना जाणूनबुजून मागे ठेवलं', PM मोदींचा मोठा आरोप; मविआवरही जोरदार टीकास्त्र| पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT