बाईपण भारी देवा चित्रपटाने रचला विक्रम ; Box Office Collection मध्ये तब्बल १०० टक्क्यांनी वाढ

Baipan Bhari Deva Box Office Collection : चित्रपट प्रदर्शित होऊन १४ दिवस झाले आहेत. १४ दिवसात चित्रपटाने भरगोस कमाई केली आहे.
Baipan Bhaari Deva Box Office Collection
Baipan Bhaari Deva Box Office CollectionSaam TV
Published On

Baipan Bhari Deva 14th Day Collection : बाईपण भारी देवा चित्रपटाने महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये देखील कमालीची वाढ झाली आहे. चला पाहूया बाईपण भारी देवा चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन.

बाईपण भारी देवा चित्रपट ३० जूनला प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होऊन १४ दिवस झाले आहेत. १४ दिवसात चित्रपटाने भरगोस कमाई केली आहे. (Latest Entertainment News)

Baipan Bhaari Deva Box Office Collection
Alia Bhatt Helps Paparazzi : आलियावर कौतुकाचा वर्षाव ; चक्क पापाराझींची चप्पल हातात घेतली अन्...

बाईपण भारी देवा चित्रपटाची कमाईचा जोर सुरुवातीला कमी होतो. पण दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने कमाईत उसळ घेतली. चित्रपटाने पहिल्या आठवड्यात १२.५० कोटींची कमाई केली तर दुसऱ्या आठवड्यात २४.८५ कोटींची कमाई केली.

केदार शिंदे यांच्या बाईपण भारी देवा चित्रपटाचे एकूण कलेक्शन ३७.३५ कोटी झाले आहे. चित्रपटाचे दुसऱ्या आठवड्याचे कलेक्शन पहिल्या आठवड्यापेक्षा ९८.८ % वाढले आहे. हा एक विक्रम आहे.

‘बाईपण भारी देवा’या चित्रपटाचे एकूण बजेट ५ कोटी होते, अशी माहिती एका वेबसाईटने दिली आहे. पण या चित्रपटाने बजेटच्या तुलनेत सातपट कमाई केली आहे.

चित्रपटाविषयी बोलायचे तर, जिओ स्टुडिओ निर्मित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने प्रत्येक स्त्रीला जगायलं शिकवलं आहे. या चित्रपटात ६ गुणी अभिनेत्रींनी अभिनय केला आहे.

या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या अभिनेत्री आहेत.

माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओज निर्मित, बेला शिंदे-अजित भुरे सह-निर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट आपल्या भेटीसाठी सज्ज झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com