Nawazuddin Siddiqui  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nawazuddin Siddiqui : संधी मिळाली तर मला आध्यात्मिक गुरू ओशो यांची भूमिका करायला आवडेल, नवाजुद्दीन सिद्दीकीने व्यक्त केली इच्छा

Rautu Ki Beli Movie : आनंद सुरापूर दिग्दर्शित “रौतू की बेली” या हिंदी चित्रपटाचा आज गोव्यात 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भव्य प्रीमियर पार पडला. हा चित्रपट उत्तर भारतातील पर्वतीय भागातील रौतू की बेली या सुंदर शहरावर आधारित आहे.

साम टिव्ही ब्युरो

Nawazuddin Siddiqui :

आनंद सुरापूर दिग्दर्शित “रौतू की बेली” या हिंदी चित्रपटाचा आज गोव्यात 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भव्य प्रीमियर पार पडला. हा चित्रपट उत्तर भारतातील पर्वतीय भागातील रौतू की बेली या सुंदर शहरावर आधारित आहे. या शहरातील एका शाळेचा वॉर्डन मृत आढळल्यानंतर पोलीस निरीक्षक नेगी आपल्या सोबत प्रेक्षकांना देखील तपास मोहिमेवर घेऊन जातो.

पत्र सूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रौतू की बेलीचा प्रमुख अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी सांगितले की, देशभरातील स्थानिक पार्श्वभूमी असलेल्या अस्सल कथा दाखवणाऱ्या चित्रपटांना जागतिक स्तरावर ओळख मिळेल. जितके स्थानिक असतील, तितके जागतिक स्तरावर पोहचतील. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चित्रपटातील भूमिका निवडण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाले की, मला केवळ एका विशिष्ट प्रकारच्या व्यक्तिरेखांपुरतेच मर्यादित रहायचे नाही, व्यक्तिरेखांच्या वैविध्यतेला माझे प्राधान्य असेल.  (Latest Marathi News)

कोणतीही व्यक्तिरेखा साकारताना त्या व्यक्तिरेखेचे जीवन जगण्याचा त्यांचा प्रयत्न असतो जेणेकरुन त्या व्यक्तिरेखेचे आयुष्य आणि त्याचे स्वतःचे जीवन एकमेकात विलीन होईल. भविष्यात कोणती भूमिका साकारण्यासाठी उत्सुक आहात असे विचारले असता अभिनेते सिद्दीकी म्हणाले की “संधी मिळाली तर मला आध्यात्मिक गुरू ओशो यांची भूमिका साकारायला आवडेल”.

चित्रपट निर्मितीमागची प्रेरणा या प्रश्नाला उत्तर देताना दिग्दर्शक आनंद सुरापूर म्हणाले की, कथा सांगण्याची आवड आणि अनोख्या कल्पना हेच माझ्या प्रेरणेचे मुख्य स्त्रोत आहेत. झी स्टुडिओचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि रौतू की बेली चित्रपटाचे पटकथा लेखक शरिक पटेल म्हणाले की, हा चित्रपट त्याच्या व्यक्तिरेखांच्या बाबतीत पठडीबाहेरचा आहे आणि हे एक हत्याकांडावरील अनोखा रहस्यपट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

WhatsApp Security : व्हॉट्सअ‍ॅप कधीच होणार नाही हॅक, सायबर एक्सपरर्टने दिला भन्नाट सल्ला

Maharashtra Live News Update: राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला

Lunar Eclipse: वर्षातलं दुसरं चंद्रग्रहण कधी? यावेळी कोणत्या गोष्टी कराव्या, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT