ic 814 Saam Tv
मनोरंजन बातम्या

IC 814 : OTT वर धुमाकूळ घालणाऱ्या वेबसीरीजवर बंदीची मागणी, 'ती' एक गोष्ट खटकली

PIL filed in Delhi HC : दिल्ली हायकोर्टात जनहित याचिका : नेटफ्लिक्स सीरिजनं दुखावल्या धार्मिक भावना ? सीरिजवर बंदी येणार ?

Sneha Dhavale

29 ऑगस्टला नेटफ्लिक्सवर रिलीज दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांची 'आईसी 814: कंदहार हायजॅक' ही वेब सीरिज सध्या सिनेप्रेमींचे लक्ष वेधते आहे. आईसी 814 हे भारतीय विमान हायजॅक करण्यात आले होते. 1999 सालच्या या प्लेन हायजॅकच्या घटनेवरची कथा आणि अभिनेता विजय वर्मा, ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह, अभिनेत्री दिया मिर्झा तसंच पंकज कपूर अशी स्टारकास्ट असलेल्या या बहुचर्चित मालिकेला सिनेप्रेमींकडून प्रचंड प्रेमही मिळत आहे. पण याचबरोबर या वेबसीरिजवर तीव्र आक्षेपही घेतला जातो आहे. कारण मुळ सत्यघटना आणि त्याचं सिनेरुपांतर या दोघांमध्ये प्रचंड विरोधाभास असल्याचा आरोप एका याचिकेत करण्यात आला आहे.

1999 सालचा 24 डिसेंबर हा दिवस आणि कंदहार प्लेन हायजॅकच्या आठवणी आजही भारतीयांच्या मनात ताज्या आहेत. पाकिस्तानी दहशतवादी संघटना 'हरकत-उल-मुजाहिद्दीन'च्या इंडियन एअरलाइन्सच्या भारतीय प्रवासी विमानाचं अपहरण केले होते. पण या मालिकेत वस्तुस्थितीचं विपरित चित्रीकरण करून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप दिल्ली हायकोर्टात दाखल झालेल्या एका जनहित याचिकेत करण्यात आला आहे.

हिंदू सेना अध्यक्ष सुरजित सिंह यादव यांनी ही याचिका दाखल केली आहे. इतकंच नाही, तर या वेब सीरिजला सेंसर बोर्डातर्फे देण्यात आलेले फिल्म सर्टिफिकेशनसुद्धा रद्द करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

'आईसी 814: कंदहार हायजॅक' या वेब सीरिजमध्ये खऱ्या अपहरणकर्त्यांची ओळख बदलण्यात आली आहे. तसेच, दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी या मालिकेत विमान अपहरणकर्त्यांना भोला आणि शंकर अशी नावे दिली आहेत. यामुळे सबंध हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. ही बाब गंभीर असून अनुभव सिन्हा यांच्या दिग्दर्शनावर बंदी घालावी, असे हिंदू सेनेचे अध्यक्ष सुरजित सिंह यादव यांनी म्हटले आहे.

या सीरिजमध्ये अपहरणकर्त्यांच्या खऱ्या ओळखीबद्दल दाखवण्यात आलेला विपर्यास यामुळं समाजात अनेक गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे, असा युक्तीवाद याचिकार्त्यांनी केला आहे. या वेब सीरिजमुळं भाविष्यातील संभाव्य हानी टाळण्यासाठी कोर्टाने यात हस्तक्षेप करावा अशी विनंती हिंदू सेनेचे अध्यक्ष सुरजित सिंह यादव यांनी केली आहे. त्यामुळे आता दिल्ली हायकोर्टात याबाबत काय भूमिका घेतंय हे पाहणे महत्वाचे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IRCTC App: रेल्वे प्रवाशांचं काम झटक्यात अन् सोपं होणार, तिकीट बुकिंगपासून सगळ्या सुविधा एकाच अ‍ॅपवर

मोठी कारवाई! अमरावतीमध्ये तब्बल ६ कोटींचे सोनं-चांदी जप्त, नागपूरवरुन निघालेल्या गाडीत सापडले घबाड!

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत बेधडक कारवाई, एकनाथ शिंदेंनी बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची केली हकालपट्टी!

Todays Horoscope: काही राशींची आर्थिक अडचण होईल दूर, तर काहींच्या नात्यात होईल वाद, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

SCROLL FOR NEXT