Pushpa 2 stampedecase SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 Stampede : 'पुष्पा 2' चेंगराचेंगरी प्रकरणात पोलिसांनी अल्लू अर्जुनला विचारले 'हे' प्रश्न !

Pushpa 2 Stampede Case : हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या नऊ दिवसांनंतर, १३ डिसेंबर रोजी पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक केली होती. पण काही तासांनंतर त्याला अंतरिम जामिनावर सोडण्यात आले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pushpa 2 Stampede : पुष्पा २ च्या प्रीमियरवेळी अल्लू अर्जुन आल्याने हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि तिच्या आठ वर्षांच्या मुलीला जीवघेण्या दुखापती झाल्यामुळे आज मंगळवारी हैदराबाद पोलिसांनी तेलुगू अभिनेता अल्लू अर्जुनची चौकशीसाठी बोलावले होते. ११ वाजताच्या दरम्यान सुरु झालेली ही चौकशी ४ तास सुरु होती या चौकशीत अल्लू अर्जूला पोलिसांनी अनेक प्रश्न विचारले.

पोलिसांनी अल्लू अर्जुनला विचारलेल्या प्रश्नांमध्ये या पुढील प्रश्नांचा समावेश आहे.

तुम्हाला प्रीमियरला येण्यास पोलिसांची परवानगी नाकारण्यात आली होती हे तुम्हाला माहिती आहे का?

पोलिसांची परवानगी नाकारली असतानाही ]तुम्हाला प्रीमियरला उपस्थित राहण्यासाठी कोणी सांगितले होते?

बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीची माहिती तुम्हाला कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याने दिली का?

महिलेच्या मृत्यूची माहिती तुम्हाला कधी मिळाली?

हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या नऊ दिवसांनंतर, १३ डिसेंबर रोजी पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक केली होती. काही तासांनंतर त्याला कनिष्ठ न्यायालयाने १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. त्यानंतर काही तासांतच, या प्रकरणाला नाट्यमय वळण आले. तेलंगणा उच्च न्यायालयाने आलू अर्जुनला तो एक अभिनेता आहे म्हणून त्याला अशा प्रकारे ताब्यात ठेवता येणार नाही असे सांगून अंतरिम जामिनावर सोडले.

दरम्यान, या प्रकरणात मृत पावलेल्या महिलेच्या पतीने चेंगराचेंगरीसाठी अल्लू अर्जूला जबाबदार न धरत त्याच्याविरुद्धतील खटला मागे घेण्यास तयार आहे. अल्लू अर्जुनने पीडितांच्या कुटुंबासाठी २५ लाख रुपयांची घोषणा केली, तर त्याच्या 'पुष्पा २: द राइज' चित्रपटाच्या निर्मात्यांनी ५० लाख रुपयांची अतिरिक्त मदत जाहीर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Super Earth discovery: नासाने शोधला Super-Earth! पृथ्वीपेक्षा 36 पट मोठा आहे ग्रह; वाचा शास्त्रज्ञांनी कसा शोधला?

Patolya Recipe: नागपंचमी स्पेशल मऊ लुसलुशीत पातोळ्या कश्या बनवायच्या? रेसिपी वाचा

Ladki Bahin Yojana: पुरूष लाभार्थी घुसलेच कसे? लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

मुंबई-आग्रा महामार्गावर बसचा भीषण अपघात, ८ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, १५ जखमी, ४ जणांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT