Priyanka Chopra New Car Instagram/@priyankachopra
मनोरंजन बातम्या

पती निक याने प्रियंकाला गिफ्ट केली आलिशान कार; प्रियंका म्हणाली सर्वोत्तम पती

Priyanka Chopra and Nick Jonas Latest News : डोळ्यांना सनग्लास लावत गाडीच्या स्टेअरिंगवर व्हीलवर हात ठेवताना प्रियंका कूल अ‍ॅटीट्यूडमध्ये दिसतेय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रियंका चोप्राने तिचा लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रियंका आलिशान कारमध्ये (Car) बसलेली दिसतेय. या गाडीवर मिसेस जोन्स असेही लिहिले आहे. डोळ्यांना सनग्लास लावत गाडीच्या स्टेअरिंगवर व्हीलवर हात ठेवताना प्रियंका (Priyanka Chopra) कूल अ‍ॅटीट्यूडमध्ये दिसतेय. फोटोच्या कॅप्शनमध्ये प्रियंकाने लिहिले की, 'आता ही राईड सुरु झाली. मला नेहमी कूल दिसण्यात मदत केल्याबद्दल निक जोन्स (Nick Jonas) धन्यवाद. सर्वोत्तम पती.' असं तिने इन्स्टाग्रामवर शेयर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. निक जोन्सने ही कस्टमाईज्ड कार पत्नी प्रियांका चोप्राला गिफ्ट केली आहे. (Priyanka Chopra Poses With Swanky Car She Received By Nick Jonas; Calls Him ‘Best Husband Ever’)

हे देखील पाहा -

सिटाडेलच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे प्रियंका

कामाबद्दल बोलायचं झालं तर सिटाडेल (Citadel) ही अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओ (Amazon Prime Video) ची मालिका आहे. प्रियांका खूप दिवसांपासून याचे शूटिंग करत आहे. सिटाडेल सीरिजची निर्मिती मार्वलचे प्रसिद्ध दिग्दर्शक जोडी अँथनी आणि जो रुसो करत आहेत. यामध्ये प्रियांकासोबत मार्वलच्या इटर्नल्स या चित्रपटाचा अभिनेता रिचर्ड मॅडन देखील दिसणार आहे. ही एक विज्ञानावर आधारित (Science fiction) मालिका आहे. याशिवाय प्रियंका टेक्स्ट फॉर यू आणि इट्स ऑल कमिंग बॅक टू मी यातही काम करतेय.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT