Hukumachi Rani Hee Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hukumachi Rani Hee: अखेर नियतीने बांधली राणी-इंद्राची लग्नगाठ; 'हुकुमाची राणी ही' मालिकेत लवकरच येणार मोठा ट्विस्ट

Hukumachi Rani Hee : सन मराठी'वरील 'हुकुमाची राणी ही' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. मालिकेतील कथानक सध्या अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे.

Shruti Vilas Kadam

Hukumachi Rani Hee : 'सन मराठी'वरील 'हुकुमाची राणी ही' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. मालिकेतील कथानक सध्या अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. मालिकेत विवाह विशेष भाग सुरू आहेत याचसह राणीची लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळते. राणीच्या लग्नाचे सोहळे म्हणजेच मुहूर्तमेढ, मेहंदी आणि हळदीचे विधी जल्लोषात पार पडत असतानाच एक अनपेक्षित घटना घडते. नुकताच मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे.

हळदीच्या समारंभात नकळत इंद्राची उष्टी हळद राणीला लागते. यानंतर मुख्य विवाह मुहूर्तावर हुंड्याच्या कारणावरून राणीचं लग्न मोडतं, आणि तिच्या कुटुंबाला चारचौघात अपमान सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत, राणीच्या घरच्यांची इज्जत वाचवण्यासाठी इंद्रा एक निर्णय घेतो. तो स्वतः राणीशी लग्न करण्यास तयार होतो. इंद्राच्या या निर्णयामुळे सगळ्यांना धक्का बसतो. अखेर राणी- इंद्राचं लग्न थाटात पार पडतं.

पण इंद्राचा हा निर्णय महाडिक कुटुंबाला मान्य नाही. आता महाडिक कुटुंब राणीचा स्वीकार करतील का? राणी-इंद्राच्या नव्या नात्याची पुढील वाटचाल कशी असणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. मालिकेत राणी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री वैभवी चव्हाण या बद्दल म्हणाली की, " मालिका सुरू झाल्यापासूनच राणी-इंद्रा या जोडीचा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. राणीचं लग्न ठरलं तेव्हा प्रेक्षकांचे मेसेज येऊ लागले. पण हुंडा न दिल्यामुळे राणीचं लग्न मोडतं आणि त्याच वेळी इंद्रा राणी बरोबर लग्न करायला तयार होतो.

हा प्रोमो पाहून प्रेक्षकवर्ग खूप खुश झाला आहे. प्रेक्षकांचं प्रेम पाहून काम करण्यासाठी नवीन ऊर्जा मिळते. अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवल्यापासून पहिल्यांदा मी नवरी म्हणून बोहोल्यावर चढली आहे. खरंच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सर्व कलाकार आणि पडद्यामागील टीमला भरपूर मेहनत घ्यावी लागते. लग्नाचे भाग शूट होत असताना कामाबरोबर आम्ही सुंदर फोटोशूट करत धमाल, मस्ती केली."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

Crime : मैत्रिणीला भेटून घरी जात होती, नराधमांनी कारमध्ये ओढलं; १६ वर्षीय मुलीवर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार

Mahashtra Politics : महायुतीत नाराजीनाट्य; माधुरी मिसाळांच्या बैठकीवर शिरसाटांची नाराजी, नेमकं काय घडलं? VIDEO

Ladki Bahin Yojana : लाडकीच्या पैशांवर भावांचा डल्ला, 14 हजार भावांनी लाटले तब्बल 21 कोटी

SCROLL FOR NEXT