Hrithik Roshan and Saba Azad Image
Hrithik Roshan and Saba Azad Image  Saam Tv
मनोरंजन बातम्या

हृतिक रोशनने साबा आझादसाठी पाठवले हार्ट इमोजी...वाचा सविस्तर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : हृतिक रोशन(Hrithik Roshan) आणि सबा आझाद(saba azad) हे बॉलिवूडचे नवे कपल आहेत, ज्यांच्या चर्चा सध्या खूप रंगत आहेत. दोघांना अनेकदा पापाराझींनी एकत्र स्पॉट केले आहे. हृतिक सबाच्या बाबतीत नेहमीच प्रोटेक्टिव आणि केयरिंग दिसला आहे. दोघांनीही त्यांच्या नात्यावर सध्या मौन पाळले आहे, पण दोघांच्या सोशल मीडियावर एकमेकांसाठीच्या पोस्ट्सवरून या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी खास नाते असल्याचे दिसून येते.

सबा आझाद हीअभिनेत्रीसोबतच एक गायिकाही आहे. सबाचे नवीन गाणे 'आय हियर युअर व्हॉईस' नुकतेच प्रदर्शित झाले असून, त्याला चांगलीच पसंती मिळत आहे. सबाच्या या गाण्याचे कौतुक हृतिक रोशनने सोशल मीडियावर केले होते. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

हृतिक रोशनने सबा आझादला तिच्या नवीन गाण्याच कौतुक करत प्रोत्साहन दिले आहे. सबाच्या गाण्याची पोस्ट आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या स्टोरीवर शेअर करताना हृतिकने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हे सुंदर गाण आहे.' यासोबतच त्याने कॅप्शनमध्ये हार्ट इमोजीही शेअर केला आहे. हृतिक रोशनची ही स्टोरी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सबा आझादचे नवीन गाणे 'आय हियर युअर व्हॉइस' १७ जून रोजी प्रदर्शित झाले आहे. हे गाणे सबाच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक आहे, ज्याची ती खूप दिवसांपासून वाट पाहत होती.

Hritik roshan share story

काही काळापूर्वी हृतिकने 'द रॉकेट बॉईज'साठी देखील सबाचे कौतुक केले होते. हृतिक रोशनने रॉकेट बॉईज ही वेबसिरीज पाहिली होती आणि ती पाहिल्यानंतर इन्स्टाग्राम अकाउंटवर या सिरीजची स्टोरी शेअर केली होती.

दरम्यान, हृतिक रोशन लवकरच त्याचा आगामी चित्रपट 'विक्रम वेधा'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सैफ अली खानही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच सबा आझाद ही वेब सिरीज 'रॉकेट बॉईज' वेब सिरीजमध्ये दिसली होती. या सिरीजमध्ये तिने परवाना इराणीची भूमिका साकारली होती. या सिरीजमध्ये त्याच्याशिवाय जिम सरभ आणि ईश्वक सिंग हे देखील मुख्य भूमिकेत दिसले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi आणि एपी ग्लोबालेचे संस्थापक अभिजीत पवार यांची नवी दिल्लीत भेट

Explainer : लोकल गर्दीमुळे आणखी किती रियांचे बळी जाणार? डोंबिवली - कोपरदरम्यानच घटना का घडताहेत?

MI Vs LSG : लखनौच्या गोलंदाजांसमोर मुंबईचा संघ गडगडला; लखनौसमोर १४५ धावांचं लक्ष्य

Modi VS Pawar | राजकारणातील भटकती आत्मा कोण? मोदी-पवारांमध्ये जुंपली

Today's Marathi News Live : ठाण्याच्या जागेचा मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य, प्रताप सरनाईक

SCROLL FOR NEXT