Saba Azad Trolled Instagram
मनोरंजन बातम्या

Saba Azad Trolled: ‘डान्स पाहून हृतिकलाही लाज वाटेल...’, सबा आझाद अनोख्या रॅम्पवॉकमुळे ट्रोल, अभिनेत्रीनं असं काय केलं?

Saba Azad Movie: सबा आझाद सध्या ‘लॅक्मे फॅशन वीक’ मधल्या एका डान्समुळे ट्रोल झाली आहे.

Chetan Bodke

Saba Azad Trolled

सध्या बॉलिवूडमध्ये सबा आझाद आणि हृतिक रोशनची प्रचंड चर्चा होतेय. मध्यंतरी त्यांच्या लग्नाच्या देखील चर्चा झाल्या होत्या. अनेकदा हे क्यूट कपल एकत्र स्पॉट झालं असलं तरीही त्यांची जोडी काही नेटकऱ्यांच्या पसंदीस पडलेली नाही. कायमच सबा आझाद नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. यावेळी सुद्धा सबा आझाद ट्रोल झाली आहे. नुकतंच एका फॅशन इव्हेंटमध्ये अभिनेत्री रॅम्पवॉक करत अचानक गाणं गात, ती नाचायला लागली. तिचा हा विचित्र प्रकार पाहून नेटकऱ्यांनी तिला तुफान ट्रोल केलं आहे.

सबा आझादबद्दल सांगायचे तर ती एक अभिनेत्री असून एक प्रसिद्ध संगीतकार देखील आहे. सबाचा एक बँड देखील आहे. या बँडच्या अंतर्गत ती अनेक शो करत असते. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत ती सिंगिंग परफॉर्मन्स देताना दिसत आहे. नुकतंच सबा आझाद ‘लॅक्मे फॅशन वीक’ या फॅशन इव्हेंटमध्ये गेली होती. या फॅशन इव्हेंटमध्ये अभिनेत्री रॅम्पवॉक करत अचानक गाणं गात, ती नाचायला लागल्यामुळे तिला नेटकऱ्यांनी तुफान ट्रोल केलंय. तिचा हा भन्नाट डान्स पाहून नेटकऱ्यांनी तिला थेट ड्रग्स ॲडिक्ट म्हणत ट्रोल केलंय.

सबाने लॅक्मेच्या फॅशन इव्हेंटमध्ये, गोल्डन रंगाचं जॅकेट आणि प्लाझो सारखी पँट परिधान केली होती. ती रॅम्पवॉक करायला आली. रॅम्पवॉक करताना अचानक डुलायला लागली आणि थेट स्टेजवरच उड्या मारायला लागली. हा विचित्र डान्स करतानाचा अभिनेत्रीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. नेमकं तिला होतंय तरी काय? असा थेट नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला. तिचा हा भन्नाट प्रकार पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं असून काहींना हसण्याचीच भूमिका घेतली आहे.

दरम्यान हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून तिच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेटकरी तिला म्हणतात, ‘हिच्या अंगात आलंय का?’, ‘जर तुझा हा व्हिडीओ हृतिकने पाहिला ना त्याला ही लाज वाटेल’ असं म्हणत तिला ट्रोल केलंय. तर एकाने तू ड्रग्ज घेतले का? असा सुद्धा प्रश्न विचारला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील वारणा धरणातून विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT