Famous Director saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Director : प्रसिद्ध डायरेक्टरची मोठी गुंतवणूक; पॉश एरियात ५ प्रापर्टी केल्या खरेदी, किती कोटींमध्ये झाली डील?

Rakesh Roshan Buy Property : हृतिक रोशनच्या वडीलांनी राकेश रोशन यांनी मुंबईत तब्बल पाच मालमत्ता खरेदी केल्या आहेत. ज्याची डील कोट्यवधींच्या घरात झाली आहे.

Shreya Maskar

राकेश रोशन यांनी मुंबईत प्रापर्टी खरेदी केली आहे.

राकेश रोशन यांनी मुंबईत पाच प्रापर्टी खरेदी केल्या आहेत.

राकेश रोशन यांनी कोटींमध्ये प्रापर्टीचे डील केले आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशनच्या वडीलांनी राकेश रोशन यांनी मुंबईत मोठी गुंतवणूक केली आहे. प्रसिद्ध डायरेक्टर राकेश रोशन यांनी मुंबईत तब्बल पाच मालमत्ता खरेदी केल्या आहेत. राकेश रोशन यांनी त्यांची पत्नी प्रमिला रोशन यांच्यासोबत मिळून मुंबईतील अंधेरी परिसरात 19.68 कोटी रुपयांचे पाच व्यावसायिक कार्यालय युनिट्स खरेदी केले आहेत. राकेश रोशन मालामाल झाले आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, वैद्य स्पेसेस प्रायव्हेट लिमिटेडकडून वैद्य वेस्ट वर्ल्ड वन एअरोपोलिस नावाच्या इमारतीत पाच कार्यालय युनिट्स राकेश रोशन यांनी खरेदी केली आहेत. ही कार्यालये इमारतीच्या आठव्या मजल्यावर आहेत. हा व्यवहार 19 नोव्हेंबर 2025 रोजी नोंदणीकृत झाला. पाच ऑफिस युनिट्समध्ये 7,500 चौरस फूट रेरा कार्पेट आणि 10 कार पार्किंग जागा आहेत. मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार, पाच ऑफिस युनिट्ससाठी भरलेले एकूण नोंदणी शुल्क ₹1.50 लाख आणि ₹1.18 कोटींहून अधिक स्टॅम्प ड्युटी आहे.

पहिली मालमत्ता

राकेश रोशन यांनी खरेदी केलेल्या मालमत्तेची किंमत 3.27 कोटी रुपये आहे. त्यात 1,259 चौरस फूटचा RERA कार्पेट एरिया आहे. या करारात कारसाठी दोन पार्किंगची जागा देण्यात आली आहे. या व्यवहारात 19.64 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि 30,000 रुपये नोंदणी शुल्क भरावे लागले.

दुसरी मालमत्ता

राकेश रोशन यांनी दुसरी मालमत्ता 2.83 कोटी रुपयांना खरेदी केली आहे. रेरा कार्पेट एरिया 1,089 चौरस फूट आहे. या करारात कारसाठी दोन पार्किंग स्पेस देण्यात आली आहे. या व्यवहारात 16.98 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि 30,000 रुपये नोंदणी शुल्क भरावे लागले.

तिसरी मालमत्ता

प्रमिला रोशन यांनी खरेदी केलेली तिसरी मालमत्ता 4.85 कोटी रुपयांची आहे. या व्यवहारात 1,869 चौरस फूट रेरा कार्पेट एरिया आहे. या करारातही दोन पार्किंग एरिया आहेत. तसेच 29.15 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरावी लागली आणि 30,000रुपये नोंदणी शुल्क भरावे लागले.

चौथी मालमत्ता

प्रमिला रोशन यांनी खरेदी केलेली चौथी मालमत्ता 5.28 कोटी रुपयांची आहे. या व्यवहारात 2,033 चौरस फूट रेरा कार्पेट एरिया आहे. दोन पार्किंग स्पेससोबत या व्यवहारात 31.71 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरावी लागली. तर 30,000 रुपये नोंदणी शुल्क भरावे लागले.

पाचवी मालमत्ता

प्रमिला राकेश रोशन यांनी खरेदी केलेली पाचवी मालमत्ता रु. 3.43 कोटी रुपयांची आहे. 1,322 चौरस फूट कार्पेट क्षेत्रफळ आहे. या करारात कारसाठी दोन पार्किंग आहेत. तसेच 20.62 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि 30,000 रुपये नोंदणी शुल्क भरावे लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: 'तू भारतीय नाही तर चिनी आहेस...', शांघाय विमानतळावर महिलेचा १८ तास छळ

12 हजार वर्षांनंतर ज्वालामुखीचा उद्रेक; राखेचे ढग दिल्ली-मुंबईत,कोणत्या विमानांच्या वेळांमध्ये बदल? VIDEO

Maharashtra Live News Update : नाशिकमधील प्रारूप मतदार यादीतून चक्क भाजप नेत्याचच नाव गायब

Face glow: चेहऱ्यावर ग्लो हवाय? थंडीच्या दिवसात हा ज्युस देईल तुम्हाला चमकदार त्वचा

Apple With Black Salt : सफरचंदावर काळे मीठ टाकून खाण्याचे फायदे, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT