Gaurav More Interview Instagram
मनोरंजन बातम्या

Gaurav More Interview: गौरव मोरेची अभिनयामध्ये कशी झाली एन्ट्री?; भावुक होत अभिनेत्याने सांगितली संघर्षाची कहाणी

Gaurav More News: अभिनेता गौरव मोरे अभिनय क्षेत्रामध्ये कसा वळाला?, त्याला अभिनयामध्ये केव्हापासून रस वाटला? याचा खुलासा मुलाखतीतून केला आहे.

Chetan Bodke

Gaurav More Interview

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे अभिनेता गौरव मोरे महाराष्ट्राच्या घराघरामध्ये प्रसिद्ध झाला आहे. गौरव मोरे आता ‘बॉईज ४’ चित्रपटानंतर ‘लंडन मिसळ’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

आपल्या खास विनोदीशैलीमुळे आणि त्याच्या अभिनयामुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नुकतंच गौरव मोरेने राजश्री मराठीच्या ‘त्याची गोष्ट’ या कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी त्याने मुलाखतीमध्ये, अभिनय क्षेत्रामध्ये कसा वळाला, त्याला अभिनयामध्ये केव्हापासून रस वाटला? याचा खुलासा केला आहे. (Marathi Actors)

गौरव मोरे मुलाखतीमध्ये म्हणाला, “मला मराठी, हिंदीसह सर्वच चित्रपट पाहायला आवडतात. अनेक सेलिब्रिटींची मिमिक्री आम्ही शाळेत असताना करायचो. मला रुपेरी पडद्यावर काम करणाऱ्या अनेक सेलिब्रिटींचं कौतुक वाटायचं. मला अभिनयाची आवड कॉलेजमध्ये असल्यापासून निर्माण झाली होती. माझे कॉलेजच्या मित्रांनी मला एकपात्री स्पर्धेबद्दल सांगितले होते. तर मला त्या स्पर्धेबद्दल खूपच आपुलकी वाटली होती, उत्सुकता वाटली होती. मला त्याबद्दल काहीच माहित नव्हतं. त्यावेळी मी BMM ला होतो आणि मी ते फक्त एकच वर्ष केलं. मला तो अभ्यास काही जमला नाही आणि मग मी नापास झालो.” (Marathi Film)

“त्या स्पर्धेमध्ये ॲक्टिंग करणारे माझे सर्व मित्र होते. त्यांचं काम खरंच मला फार आवडलं होतं. त्यांच्याविषयी मला खूपच आपुलकी आहे. मी तेव्हापर्यंत फक्त नाटक हाच शब्द ऐकत आलो होतो. मला एकपात्री नाटक आणि बाकी विषयी मला काही माहिती नव्हतं. मुलं आपला अभिनय सादर करतंय आणि त्यांच्यासाठी सर्व ऑडिटोरियम टाळ्या वाजवत आहे, हे पाहून मला खूप आवडलं. ते बक्षिसं घेत आहेत, न्यूजवाले येऊन त्यांच्या मुलाखती घेत आहेत. त्यादिवशी मला माहित झालं, आपल्याला पुढे आयुष्यात काय करायचंय.” असं तो मुलाखतीमध्ये म्हणाला. (Entertainment News)

“त्यानंतर मी लगेचच माझ्या मित्राला फोन केला. मित्रा मला कळालं आहे, मला करियरमध्ये काय करायचंय?, मला अभिनयामध्येच आवड आहे, असं मी माझ्या मित्राला सांगितलं. मग तेव्हापासून माझी सिनेकारकिर्द सुरु झाली.” असं गौरव मोरेने मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वर्ध्यात वीज पडून दोन ठार, एक गंभीर

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT