Housefull 5 OTT Release SAAM TV
मनोरंजन बातम्या

Housefull 5 OTT Release : तुफान कॉमेडी अन्...; अक्षय-रितेशचा 'हाऊसफुल 5' ओटीटीवर कुठे अन् कधी पाहता येणार? वाचा अपडेट

Housefull 5 OTT Release Update : अक्षय कुमार, अभिषेक बच्चन आणि रितेश देशमुखचा कॉमेडी चित्रपट 'हाऊसफुल 5' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे ओटीटी अपडेट जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बहुप्रतिक्षित चित्रपट 'हाऊसफुल 5' (Housefull 5) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तर चित्रपटातील गाणी सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घालत आहेत. हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर काही वेळात ओटीटीवर पाहता येणार आहे. चित्रपटाचे ओटीटी अपडेट (OTT Release Update) जाणून घेऊयात.

'हाऊसफुल 5' ओटीटी रिलीज

'हाऊसफुल 5' चित्रपट 6 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट थिएटर रिलीजनंतर काही काळात ओटीटीवर पाहता येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'हाऊसफुल 5' चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. 'हाऊसफुल 5' चे ओटीटी राइट्स अमेझॉन प्राइम व्हिडिओनं खरेदी केले आहेत.

अद्याप 'हाऊसफुल 5' चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची डेट जाहीर करण्यात नाही आली आहे. मात्र चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर 6 ते 8 आठवड्यात अमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहता येईल असे बोले जात आहे. जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला 'हाऊसफुल 5' ओटीटीवर पाहायला मिळेल.

'हाऊसफुल 5' स्टारकास्ट

'हाऊसफुल 5'ची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केले आहे. 'हाऊसफुल 5'मध्ये बॉलिवूडच्या तगडे कलाकार पाहायला मिळणार आहेत. यात अक्षय कुमार, रितेश देशमुख ,अभिषेक बच्चन ,जॅकलीन फर्नांडिस, संजय दत्त ,नर्गिस फाखरी, फरदीन खान,जॅकी श्रॉफ हे कलाकार आहेत. तर मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे देखील या चित्रपटाचा भाग आहे. तसेच कॉमेडी किंग आणि मराठी दिग्गज अभिनेते नाना पाटेकर या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

'हाऊसफुल 5' बजेट किती?

'हाऊसफुल 5' हा 'हाऊसफुल' फ्रँचायझीचा 5 वा भाग आहे. 'हाऊसफुल' चित्रपटाच्या चारही भागांमध्ये तुफान कॉमेडी पाहायला मिळाली. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई केली. 'हाऊसफुल 5'मध्येही कॉमेडी आणि ॲक्शन पाहायला मिळणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'हाऊसफुल 5' चित्रपटाचे बजेट 375 कोटी रुपये आहे. 'हाऊसफुल 5' देखील बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करेल असे बोले जात आहे. चाहते चित्रपट पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Three Language Policy : मोठी बातमी! अखेर त्रिभाषा धोरणासाठी समिती स्थापन, ७ जणांचा समावेश

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

Samsung Galaxy S25 FE 5G मोबाईल लाँच, अपग्रेडेड बॅटरीसह जाणून घ्या खास फिचर्स आणि किंमत

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

SCROLL FOR NEXT